मराठी बातम्या /बातम्या /देश /

Health Update Sonia Gandhi : कोरोनानानंतर कशी आहे सोनिया गांधींची तब्येत? काँग्रेसकडून आली अपडेट

Health Update Sonia Gandhi : कोरोनानानंतर कशी आहे सोनिया गांधींची तब्येत? काँग्रेसकडून आली अपडेट

मागच्या काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोना झाला होता. (Former Congress president Sonia Gandhi was coronated)

मागच्या काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोना झाला होता. (Former Congress president Sonia Gandhi was coronated)

मागच्या काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोना झाला होता. (Former Congress president Sonia Gandhi was coronated)

  नवी दिल्ली, 17 जून : मागच्या काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोना झाला होता. (Former Congress president Sonia Gandhi was coronated) दरम्यान त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असे बोलले जात असले तरी आज आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याचे दिसून येत आहे. (health update Sonia Gandhi)

  काँग्रेसने त्यासंबंधीचे आरोग्य अपडेट दिले आहेत. यामध्ये काँग्रेस नेते जयराम रमेश यांनीही सांगितले की, १२ जून रोजी सोनिया गांधींच्या नाकातून रक्त येत होते, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या सोनिया रुग्णालयातच आहेत. दिल्लीच्या गंगाराम या रुग्णालयात त्या सध्या उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचेही सांगण्यात आले.

  हे ही वाचा : Monsoon Update : विदर्भात जोरदार पावसाचा alert, तर राज्यातील काही जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज

  जयराम यांच्या म्हणण्यानुसार, सोनिया गांधी यांच्यावर रुग्णालयात तातडीने उपचार सुरू झाले आहेत. काल (दि.17) गुरुवारी त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता, नंतर त्यांच्या खालच्या श्वसनमार्गामध्ये बुरशीजन्य संसर्ग झाल्याचे आढळून आले. जयराम रमेश यांनी लिहिलेल्या पत्रात सोनिया गांधींवर सध्या उपचार सुरू आहेत, त्यांना कोविडनंतर आणखी काही समस्या आहेत. सध्या डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.

  नॅशनल हेराल्ड प्रकरणाची ईडीकडून चौकशी

  नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीकडून चौकशी सध्या सुरू आहे. राहुल गांधींसोबत सोनियांनाही ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. पण कोविडमुळे त्या तपासात सहभागी होऊ शकल्या नाहीत. सध्या ईडीने सोनियांना 23 जूनला हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहेत. पण त्यांच्या प्रकृतीत तोपर्यंत सुधारणा होईल की नाही याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे.

  हे ही वाचा : नॅशनल हेरॉल्ड केस : ईडीचा राहुल गांधींना मोठा दिलासा, आजची सुनावणी स्थगित

  राहुल गांधी यांची विनंती ईडीकडून मान्य

  काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी शुक्रवारी होणाऱ्या चौकशीमधून सूट मिळावी यासाठी ईडीला पत्र पाठवलं होतं. राहुल गांधींची ही मागणी ईडीनं मान्य केली आहे. आता त्यांची सोमवारी चौकशी करण्यात येणार आहे. राहुल गांधी यांची नॅशनल हेरॉल्ड (National Herald) प्रकरणात या आठवड्यात तब्बत 30 तास चौकशी करण्यात आली आहे. राहुल यांच्या विनंतीवरून यापूर्वी गुरूवारी होणारी त्यांची चौकशी स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवारच्या चौकशीतूनही सूटका व्हावी यासाठी त्यांनी विनंती केली होती, ती विनंती ईडीनं मान्य केली आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Rahul gandhi, Sonia gandhi, Young Congress

  पुढील बातम्या