विरुधुनगर, 12 फेब्रुवारी: तामिळनाडूमधून एक दुःखद घटना समोर आली आहे. येथील एका फटाक्यांच्या कारखान्याला भीषण आग लागली आहे. या आगीत 14 जणांचा जिवंत जळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर अनेक कामगार जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. जखमी कामगारांना शिवकाशी येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काहींची स्थिती नाजूक असून मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आगीच्या भक्ष्यस्थानी गेलेला फटाक्यांचा कारखाना तामिळनाडूतील विरुधुनगर जिल्ह्यातील साथूर जवळील अचनगुलाम परिसरात आहे. यावेळी फटाके बनवण्यासाठी काही केमिकल्स एकमेकांत मिसळल्याने हा अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या अपघातानंतर कारखान्याला भीषण आग लागली. ही आग विझवण्यासाठी अग्निशमनदलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
Fire at a firecracker factory in Virudhunagar, Tamil Nadu is saddening. In this hour of grief, my thoughts are with the bereaved families. I hope those injured recover soon. Authorities are working on the ground to assist those affected: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) February 12, 2021
या अपघात प्रसंगी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करुन शोक व्यक्त केला आहे. त्यांनी या घटनेची माहिती देत, जखमी लोकं लवकर बरी व्हावीत यासाठी पंतप्रधानांनी प्रार्थना केली आहे. शिवाय पीडितांच्या मदतीसाठी एक टीम घटनास्थळी कार्यरत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच दुसऱ्या एका ट्वीटमध्ये त्यांनी पीडितांना मदतीची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी PMNRFकडून मृत व्यक्तींना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि गंभीर जखमींना 50,000 रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे.
हे ही वाचा-Murder Case: ज्या इस्लामच्या पत्नीला रिंकूने रक्त दिलं होतं; त्याचीच केली हत्या
कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही पीडितांच्या कुटुंबीयांसाठी दुःख व्यक्त केलं आहे. तसेच राज्यसरकारने पीडितांना तातडीची मदत द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या अपघातात संबंधित कारखाना जळून खाक झाला असून दृश्य भयानक दृश्य समोर येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.