आसाम, 01 डिसेंबर : आसाममध्ये एका रेल्वेत स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात अनेक प्रवाशी जखमी झाले आहे. आसाम पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.
आसामच्या उदलगुडी भागात ही घटना घडली आहे. आसाम -इंटरसिटी एक्सप्रेसमधील एका बोगीत हा स्फोट झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी 6.45 च्या सुमारास धावत्या रेल्वेत हा स्फोट झाला.
रेल्वे कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिसिंगा रेल्वे स्टेशनजवळ रात्री सात वाजून ४ मिनिटांनी कामाख्या-डेकारगांव इंटरसिटी एक्स्प्रेसच्या एका डब्यात स्फोट झाला.
या स्फोटात एकूण 11 प्रवासी जखमी झाले. एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Assam: Explosion inside Kamakhya-Dekargaon Intercity Express in Udalguri. 11 persons injured. pic.twitter.com/M61eRSkBnL
— ANI (@ANI) December 1, 2018
रेल्वेचे कर्मचारी आणि पोलीस अधिकारी गुवाहाटीवरुन जवळपास ९५ किलोमिटर दूर घटनास्थळी पोहोचले आहे.
परंतु, हा स्फोट नेमका कशामुळे झाला याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे.
===========================