फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, स्फोटानंतर 50 मजूर बेपत्ता

फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, स्फोटानंतर 50 मजूर बेपत्ता

फटाक्यांच्या कारखान्यात संध्याकाळी 5 वाजताच्या सुमाराला हा स्फोट झाला. या स्फोटानंतर ढिगाऱ्याखाली 50 मजूर अडकल्याची भीती आहे.

  • Share this:

गुरुदासपूर (पंजाब ), 4 सप्टेंबर : पंजाबमधल्या गुरुदासपूरमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. या स्फोटात 16 जणांचा मृत्यू ओढवला. सुमारे 30 ते 40 जण जखमी झाले. त्याचबरोबर 50 मजूर ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे.फटाक्यांच्या कारखान्यात संध्याकाळी 5 वाजताच्या सुमाराला हा स्फोट झाला. या स्फोटातल्या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.या स्फोटानंतर बचावकार्यासाठी NDRF ची दोन पथकं पाठवण्यात आली आहेत.

गुरुदासपूर हा भाजपचे खासदार सनी देओल यांचा मतदारसंघ आहे. बटालामधल्या या स्फोटाच्या घटनेबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. NDRF आणि प्रशासकीय यंत्रणांनी बचावकार्य सुरू केलं आहे, अशीही माहिती त्यांनी दिली आहे.

पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच हिंदू मुलगी बनली पोलीस अधिकारी

====================================================================================================================

SPECIAL REPORT : या कारणामुळे आली आहे मंदी, पाहा VIDEO

<iframe class="video-iframe-bg-color iframe-onload" onload="resizeIframe(this)" id="story-404822" scrolling="no" frameborder="0" width="100%" src="https://lokmat.news18.com/embed/videos/NDA0ODIy/"></iframe>

First published: September 4, 2019, 7:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading