कांडला बंदराजवळ रसायन साठ्याचा स्फोट, चौघांचा मृत्यू

कांडला बंदराजवळ रसायन साठ्याचा स्फोट, चौघांचा मृत्यू

कांडला बंदराजवळ इंडियन ऑइल रिफायनरी आहे. त्याच्या जवळच रसायनसाठ्यांचा स्फोट झाला

  • Share this:

अहमदाबाद, 30 डिसेंबर : गुजरातच्या कांडला बंदराजवळ एक भीषण स्फोट झाल्याचं वृत्त येत आहे. कांडला बंदराजवळ इंडियन ऑइल रिफायनरी आहे. त्याच्या जवळच रसायनसाठ्यांचा स्फोट झाला, अशी प्राथमिक माहिती हाती आलेली आहे. या स्फोटात चार जण मृत्युमुखी पडले आहेत.

इंडियन ऑइल रिफायनरीजवळ रसायनसाठ्यासाठीचं वेअरहाउस आहे. तिथे स्फोट झाला. हा स्फोट नेमका कसा झाला, का झाला, हा अपघात आहे किंवा काय याचा अद्याप तपास झालेला नाही. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या आहेत आणि आग नियंत्रित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कांडला बंदराजवळ केमिकल स्टोरेज टँकचे स्फोट झाले. मोठ्या आवाजानंतर आग लागली आणि त्यात इथे कामाला असलेले अडकले. चौघांचा जागीच मृत्यू झाला.

(ही बातमी अपडेट होत आहे.)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 30, 2019 05:01 PM IST

ताज्या बातम्या