मध्य प्रदेशमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, 20 ठार

मध्य प्रदेशमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, 20 ठार

मध्य प्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यामध्ये फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामध्ये २० कामगारांचा जागीच मृत्यू झालाय. तर ८ जण जखमी आहेत.

  • Share this:

07 जून : मध्य प्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यामध्ये फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामध्ये २० कामगारांचा जागीच मृत्यू झालाय. तर ८ जण जखमी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ग्राम खैरी जंगलामध्ये वारसी फटाक्यांच्या कंपनीत दुपारी 2 च्या सुमारास भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की या स्फोटात 20 जणांचा मृत्यू झाला.  मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या कारखान्याला लागून गोदाम पण होते. त्यामुळे स्फोटाची तीव्रता जास्त होती. कारखान्यात ३० ते ४० जण होते. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 7, 2017 09:11 PM IST

ताज्या बातम्या