मराठी बातम्या /बातम्या /देश /

पंजाबमधल्या स्फोटाबद्दल पोलिसांचा यू टर्न, तरनतारनमध्ये 2 जणांचा मृत्यू झाल्याचं केलं स्पष्ट

पंजाबमधल्या स्फोटाबद्दल पोलिसांचा यू टर्न, तरनतारनमध्ये 2 जणांचा मृत्यू झाल्याचं केलं स्पष्ट

पंजाबमधल्या तरनतारनमध्ये बाबा दीपसिंहजी यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात भीषण स्फोट झाला. या स्फोटात 2 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय.

    तरनतारन (पंजाब) 8 फेब्रुवारी : पंजाबमधल्या तरनतारनमध्ये बाबा दीपसिंहजी यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात भीषण स्फोट झाला. या स्फोटात 2 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय. याआधी पोलिसांनी या स्फोटात 14 जणांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं होतं पण आता मात्र ही आकडेवारी समोर आली आहे. नगर कीर्तनाच्या या कार्यक्रमात स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली. हा स्फोट नेमका कसा झाला याचं कारण कळू शकलेलं नाही पण आतषबाजी होत असताना रसायनांमुळे हा स्फोट झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. 9 जण जखमी स्फोटात 9 जण जखमी असून याठिकाणी बचावकार्य सुरू आहे. तरनतारन हा भारत पाकिस्तान सीमेवरचा जिल्हा आहे. याठिकाणी तपास झाल्यानंतरच स्फोटामागचं कारण कळू शकेल.स्फोटात जखमी झालेल्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. जखमींमध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे. हा स्फोट इतका भीषण होता की मृत्युमुखी पडलेल्यांचे अवशेष सगळीकडे पसरले गेले. हे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले आहेत. (हेही वाचा : जपानच्या क्रुझला 'कोरोना'चा विळखा; शेकडो भारतीयही अडकले) आधीही झाले होते स्फोट याआधी अमृतसरमध्ये 2018 मध्ये निरकांरी भवनमध्ये अशाच प्रकारचा हल्ला झाला होता. यामध्ये 3 जणांचा मृत्यू ओढवला तर अनेक जण जखमी झाले. या हल्ल्यामध्ये खलिस्तानी दहशतवाद्यांचा हात होता, असं समोर आलं होतं.याच तरनतारन जिल्ह्यात 2019 मध्येही स्फोट घडवण्यात आले होते. पाकिस्तानची ISI संघटना पंजाब आणि आसपासच्या राज्यांत 26/11 सारखे हल्ले करण्याच्या तयारीत होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली होती. यासाठी ISI ने ड्रोनच्या माध्यमातून पंजाबमध्ये AK - 47 सारखी शस्त्रं टाकली होती. त्यामुळे तरनतारनच्या या स्फोटामागे दहशतवादी हल्ल्याची शक्यता नाकारता येत नाही, असं म्हटलं जातंय पण तपास सुरू आहे. ============================================================================
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    पुढील बातम्या