Home /News /national /

दिल्लीतील मरकझमध्ये सहभागी झालेल्या विदेशी नागरिकांनाबाबत गृहमंत्रालयाने घेतला मोठा निर्णय

दिल्लीतील मरकझमध्ये सहभागी झालेल्या विदेशी नागरिकांनाबाबत गृहमंत्रालयाने घेतला मोठा निर्णय

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असताना दिल्लीतील निझामुद्दीन परिसरात तबलिगी समाजानं मरकझ कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.

    नवी दिल्ली, 4 जून : दिल्लीत निझामुद्दीन परिसरात झालेल्या तबलिगी समाजाच्या मरकझमध्ये सहभागी झालेल्या विदेशी नागरिकांबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने कठोर कारवाई केली आहे. मरकझमध्ये सहभागी झालेल्या 960 हून जास्त विदेशी नागरिकांना 10 वर्षांसाठी ब्लॅकलिस्ट करण्यात आलं आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असताना दिल्लीतील निझामुद्दीन परिसरात तबलिगी समाजानं मरकझ कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्यात सहभागी झालेल्या विदेशी नागरिकांवर केंद्रीय गृहमंत्रालयानं भारतात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी केलेल्या शिफारिशीनंतर गृहमंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे, तबलिगी समाजाचा प्रमुख मौलाना साद यांच्याविरुद्ध कसून चौकशी सुरू आहे. मौलाना साद आपल्या कुटुंबीयासोबत जामिया नगरात राहात असल्याची माहिती सूत्रोंनी दिली आहे. काय म्हणाले होते गृहमंत्री? दरम्यान, मरकझमध्ये सहभागी झालेले तबलिगी अनेक राज्यांत गेल्याने प्रशासनाची झोप उडाली होती. यातील काही जणांपर्यंत पोहोचण्यात प्रशासनाला यश आलं. यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या आठवड्यात मरकझबाबत एक महत्त्वाचं विधान केलं होतं.  मरकजचा कार्यक्रम वेळीच रोखला असता तर परिस्थिती बिघडली नसती, अशी कबुली अमित शहा यांनी दिली होती. महाराष्ट्राच्या लॉकडाऊन नियमावलीत पुन्हा बदल; असे आहेत नवे नियम दिल्ली हायकोर्टानं निझामुद्दीन येथील मरकज प्रकरणी 955 विदेशी नागरिकांना 9 वेग-वेगळ्या ठिकाणी ठेवण्याचे आदेश काही दिवसांपूर्वी दिले होते. न्यायमूर्ती विपिन सांघी आणि न्यायमूर्ती रजनीश भटनागर यांच्या न्यायपीठात व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून या प्रकरणी सुनावणी झाली होती. विना परवानगी तबलिगी समाजाचे विदेशी नागरिक कुठेही जाऊ शकत नाही, असे निर्देश हायकोर्टानं दिले होते. एवढंच नाही तर या नागरिकांच्या खाण्या-पिण्याची सर्व व्यवस्था तबलीगी जमातने ठेवावी, असेही हायकोर्टानं आपल्या आदेशात म्हटलं आहे. विदेशी नागरिकांना ज्या ठिकाणी ठेवण्यात येईल, तेथून त्यांना कुठे जाण्याची परवानगी नसेल. सध्या या नागरिकांना दिल्लीतील विविध क्वारंटाईन सेंटर्समध्ये ठेवण्यात आलं आहे. अन्य बातम्या उद्योग क्षेत्रातील मोठं पाऊल; नोकरीसाठी आता शहरात जाण्याची गरज नाही नोकरी जाण्याचं टेन्शन आता विसरा, लॉकडाऊनमध्ये हे काम करून लाखो कमवा
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या