Lockdown : काळाबाजार करणाऱ्यांना दणका,  होणार 7 वर्षांचा तुरुंगवास

Lockdown : काळाबाजार करणाऱ्यांना दणका,  होणार 7 वर्षांचा तुरुंगवास

'जीवनावश्यक वस्तूंची वाजवी दरात उपलब्धता व्हावी यासाठी राज्य सरकारांनी काळजी घ्यावी आणि नियम मोडणाऱ्यांना कठोर शासन करावे.'

  • Share this:

नवी दिल्ली 08 एप्रिल : देशभरात लॉकडाऊन लक्षात घेता उत्पादक आणि कामगारांच्या संकटात वाढ होत  आहे.  त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा काळ्या बाजार  होण्याची होण्याची शक्यता आहे.  या  विरोधात कठोर कारवाई केली जावी,असे पत्र केंद्राने राज्य व केंद्र शासित प्रदेशांना लिहले आहे. त्यामुळे जर काळा बाजार केला तर थेट 7 वर्षासाठी तुरुंगात जाण्याची वेळ साठवणूक आणि काळाबाजार करणाऱ्यांवर येण्याची शक्यता आहे.  केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना याबाबत पत्र लिहिले आहे.

गृह मंत्रालयाने आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत आवश्यक वस्तूंचा त्यात समावेश केला आहे. वाहतूक आणि इतर संबंधित पुरवठा साखळी उपक्रम देखील यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. तथापि, विविध कारणांमुळे उत्पादन कमी झाल्याच्या बातम्या आल्या आहेत, विशेषत: कामगार पुरवठा कमी झाला आहे. या परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करून त्याची  अधिक दराने विक्री करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज्य सरकारांना  गृह मंत्रालयाने पत्र पाठवून कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.

हे वाचा - आशेचा किरण! देशातील 400 जिल्ह्यांमध्ये Covid – 19 चा एकही रुग्ण नाही

दोषी ठरल्यास सात वर्षांची शिक्षा किंवा दंड राज्य सरकार करू शकणार आहे. आणि केंद्रशासित प्रदेशांना जीवनावश्यक वस्तूंचा कायदा  लागू करून जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी त्वरित पावले उचलण्यास केंद्र सरकारने सांगितले आहे. साठवण मर्यादा ठरविणे, किंमत मर्यादा निश्चित करणे, उत्पादन वाढविणे, डीलर्सची खाती तपासणे आणि इतर उपाय या गोष्टींचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे.

हे वाचा - राज्यात 117 नवे रुग्ण, संख्या 1135 वर; आजचे 9 महत्त्वाचे कोरोना अपडेट

जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्ह्यांत दोषी आढळल्यास सात वर्षापर्यंतची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्हीही असू शकतात. राज्य आणि केंद्र शासित प्रदेश ब्लॅक मार्केटींग प्रतिबंधक आणि अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा  देखभाल अधिनियमा अंतर्गत गुन्हेगारांना ताब्यात घेण्याचा विचार करू शकतात.  या वस्तूंची वाजवी दरात उपलब्धता व्हावी, यासाठी आपणास तातडीने पावले उचला अशी विनंतीही गृहमंत्रालयाने राज्य सरकारांना केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 8, 2020 10:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading