कर्नाटक दिनानिमित्त बेळगावमध्ये मराठी बांधवांचा आज काळा दिवस

कर्नाटक दिनानिमित्त बेळगावमध्ये मराठी बांधवांचा आज काळा दिवस

कर्नाटक राज्य आणि प्रशासनाच्या वतीने आज विजयोत्सव साजरा केला जात असला तरी मराठी भाषिक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज सीमाभागात काळा दिन पाळण्यात येणार आहे.

  • Share this:

बेळगाव1 नोव्हेंबर:  आज 1 नोव्हेंबर,आज कर्नाटक राज्याची स्थापना झाली पण आजच्याच दिवशी सीमाभागातील मराठी बांधव काळा दिन साजरा करतो. कर्नाटक राज्य आणि प्रशासनाच्या वतीने आज विजयोत्सव साजरा केला जात असला तरी मराठी भाषिक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज सीमाभागात काळा दिन पाळण्यात येणार आहे.

आज सकाळी दहा वाजता बेळगाव शहरातील संभाजी उद्यानमधून मराठी भाषिक मूक सायकल फेरी काढणार असून त्यातून कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात येणार आहे. दरवर्षी सीमाभागातील मराठी भाषिक ही निषेध फेरी काढतात. गेल्यावर्षी याच कर्नाटक पोलिसांनी अमानुष अत्याचार करत लाठीमार केला होता पण आज कानडी अत्याचाराच्या विरोधात पुन्हा एकदा सीमाभागातील लोक एल्गार पुकारणार आहेत. आज बेळगाव महापालिकेचे नगरसेवक, महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आणि सीमावासीय मोठ्या संख्येने या मूक फेरीत सहभागी होणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून सीमा प्रश्न प्रलंबित आहे. अजूनही यावर कुठलाच उपाय निघालेला नाही.

First published: November 1, 2017, 8:41 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading