वाजपेयींच्या निधनानंतर पूनम महाजनांना आली वडिलांची आठवण, शेअर केला हा भावूक फोटो

पुन्हा एकदा वडिलांना गमावल्याचे दुःख होत आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 17, 2018 02:42 PM IST

वाजपेयींच्या निधनानंतर पूनम महाजनांना आली वडिलांची आठवण, शेअर केला हा भावूक फोटो

नवी दिल्ली, १७ ऑगस्ट- भारतीय जनता युवा मोर्चाच्या (बीरेव्हायएम) राष्ट्रीय अध्यक्षा पूनम महाजन यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली दिली आहे. शुक्रवार, १७ ऑगस्टला ट्विटरवर वडील दिवंगत प्रमोद महाजन आणि अटल बिहारी वाजपेयी यांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना पूनम यांनी लिहिले की, ‘मला खात्री आहे तुम्ही दोघं आता एकत्र असाल...’ याआधी केलेल्या ट्विटमध्ये पूनम यांनी म्हटले की, पुन्हा एकदा वडिलांना गमावल्याचे दुःख होत आहे. वाजपेयी फक्त प्रमोद महाजनांसाठीच नाही तर आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी वडिलांसमान होते. त्यांचं आमच्या हृदयातलं स्थान कायम तसंच राहील.

Loading...

पूनमच्याआधी अमृता फडणवीस यांनीही देवेंद्र फडणवीस यांचा लहानपणीचा अटलजींसोबतचा फोटो शेअर केला आहे. तेव्हा देवेंद्र शाळेत होते. अटलजी नागपूरात आले असताना, देवेंद्र त्यांना भेटले होते. त्यावेळी अटलजींनी त्यांना जवळ घेत त्यांचं कौतुक केलं होतं. ज्या वेळी माझे वडिल गेले त्या वेळी जे दु:ख झालं तेवढच दु:ख अटलींच्या जाण्याने झालं अशी प्रतिक्रीया गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी व्यक्त केली. अटलजी मला मुलगी मानायचे. त्यांच्या कवितांची कॅसेट जेव्हा मी काढली तेव्हा त्यांनी माझं तोंड भरून कौतुक केलं होतं.

VIDEO: अटल बिहारी वाजपेयींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घ्यायल्या गेलेल्या स्वामी अग्निवेश यांना मारहाण

अटलजी हे माणूस म्हणूनही खूप मोठे होते. वाजपेयी जेव्हा पाकिस्तानला बस घेऊन गेले त्यावेळी वाजपेयींनी मला फोन करून पाकिस्तानला येण्यासाठी निमंत्रण दिलं होतं. तुम्ही आलात तर पाकिस्तानातल्या लोकांनाही आनंद होईल असं ते म्हणाले पण काही कामांमुळे मला जाता आलं नाही, ही खंत लता दीदींनी बोलून दाखवली. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे मी नि:शब्द झालो आहे, शून्य झालो आहे. एका युगाचा अस्त झालाय अशी प्रतिक्रीया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 17, 2018 02:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...