Home /News /national /

भाजपच्या या फ्रायरब्रँड प्रवक्त्यालाही कोरोनाची लक्षणं, हॉस्पिटलमध्ये केलं दाखल

भाजपच्या या फ्रायरब्रँड प्रवक्त्यालाही कोरोनाची लक्षणं, हॉस्पिटलमध्ये केलं दाखल

पात्रा हे भाजपचे प्रवक्ते असून टीव्हीवरच्या चर्चेत ते कायम पक्षाची बाजू अतिशय आक्रमकपणे मांडत असतात. त्याची कायम चर्चाही होत असते.

    नवी दिल्ली 28 मे: भाजपचे फायरब्रँड प्रवक्ते आणि पक्षाचे नेते डॉ. संबित पात्रा यांना आज कोरोनाची लक्षणं दिसू लागल्याने हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे.पात्र हे आज सकाळपर्यत सक्रिय होते. मात्र त्यांना सर्दी, कफ, खोकला आणि हलकासा ताप ही कोरोनाची प्राथमिक लक्षणं दिसू लागल्याने त्यांना तातडीने मेदांता हॉस्पिटलमध्ये (Medanta Hospital Gurugram) भरती करण्यात आलं. त्यांची कोव्हिड टेस्ट करण्यात आली आहे. पात्रा हे भाजपचे प्रवक्ते असून टीव्हीवरच्या चर्चेत ते कायम पक्षाची बाजू अतिशय आक्रमकपणे मांडत असतात. त्याची कायम चर्चाही होत असते.  पात्रा हे राजकारणात असले तरी ते व्यवसायाने सर्जन आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी त्यांचं गृहराज्य असलेल्या ओडिशामधून निवडणुकही लढवती होती. मात्र त्यात त्यांना यश आलं नाही. दरम्यान, कोरोनामुळे देशासह राज्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे देशाची अर्थव्यवस्थेची चाकं थांबली आहे. लॉकडाऊनचा फटका सर्वत्र क्षेत्रातील उद्योगांना बसला आहे. बांधकाम व्यावसायिकांही याचा मोठा फटका बसला आहे. लॉकडाऊननंतर स्थिरस्थावर व्हायला किमान 9 ते 12 महिने लागतील, असे महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीच्या (क्रेडाई-एमसीएचआय) नव्या अहवालात म्हटलं आहे. हेही वाचा.. मुंबईसह पुणे शहर 10 दिवस बंद राहणार, आर्मी तैनात होणार? काय म्हणाले गृहमंत्री क्रेडाई-एमसीआयने प्रश्नावलीच्या माध्यमातून 500 सदस्यांच्या माहितीच्या आधाराने अहवाल प्रकाशित केला आहे. या संशोधन अहवालात असे दिसून आले आहे की, 60 टक्के विकासक मानतात की, लॉकडाऊननंतर 9 -12 महिन्यांत रिअल इस्टेटचा व्यवसाय सामान्य होताना दिसेल तर केवळ 30 टक्के विकासकांच्या मते 6 महिन्यांत व्यवसाय सामान्य होईल.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या