रॉबर्ट वाड्रा 'रोडपती'चे 'करोडपती' कसे झाले? भाजपने डागली तोफ

रॉबर्ट वाड्रा 'रोडपती'चे 'करोडपती' कसे झाले? भाजपने डागली तोफ

वाड्रांची चौकशी सुरू होताच भाजपने काँग्रेस आणि रॉबर्ट वाड्रा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.

  • Share this:

नवी दिल्ली 06 फेब्रुवारी : रॉबर्ट वाड्रा यांच्या ईडी चौकशीमुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं आहे. वाड्रांची चौकशी सुरू होताच भाजपने काँग्रेस आणि रॉबर्ट वाड्रा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. 'रोडपती' असणारे रॉबर्ट 'करोडपती' कसे झाले असा सवाल भाजपचे प्रवक्ते सांबित पात्रा यांनी केला आहे.

पात्रा यांनी पत्रकार परिषद घेऊन वाड्राच्यावर भ्रष्टाचाराचा पुन्हा एकदा आरोप केला. रॉबर्ट यांची लडंनमध्ये कोट्यवधींची संपत्ती असून 2009मध्ये युपीएचं सरकार असताना त्यांनी पेट्रोलियम आणि संरक्षण करारांमध्ये मोठ्या प्रमाणावर दलाली घेतली असा आरोप केलाय.

तर प्रियांका गांधी यांनी या चौकशीवर प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधलाय. ईडीच्या चौकशीचं जे काही सुरू आहे त्याच्या मागचं खरं कारण सर्व जगाला माहित आहे अशी प्रतिक्रिया प्रियांका यांनी काँग्रेस मुख्यालयात व्यक्त केली. केंद्र सरकार सुडाचं राजकारण करत असल्याचं त्यांना त्यातून सूचित करायचं होतं.

तपास यंत्रणांपुढे हजर होण्याची रॉबर्ट वाड्रा यांची ही पहिलीच वेळ आहे. रॉबर्ट वाड्रा यांना जवळपास 40 प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील अशी माहिती समोर येत आहे. ईडी कार्यालयामध्ये पोहोचण्यापूर्वी रॉबर्ट वाड्रा यांच्या वकिलांची टीम हजर झाली होती.

दरम्यान, मनी लॉड्रिंग प्रकरणामध्ये अटकेपासून संरक्षण मिळावं यासाठी रॉबर्ट वाड्रा यांनी पटियाला कोर्टात धाव घेतली होती. त्यामुळे त्यांना 16 फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून दिलासा मिळाला आहे. रॉबर्ट यांची रात्री उशीरा पर्यंत ही चौकशी चलण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण?

मनी लाँडरिंगचं प्रकरण लंडनमधील मालमत्तेच्या खरेदीशी संबंधित आहे. लंडनमधील 'ब्रायनस्टन स्क्वेअर' येथे 17 कोटी रूपयांचा प्लॅट रॉबर्ट वाड्रा यांनी खरेदी केला होता. फ्लॅट विकत घेताना मनी लाँडरिंग झाल्याचा आरोप रॉबर्ट वाड्रा यांच्यावर आहे. शिवाय, हा फ्लॅट देखील वाड्रा यांच्या मालकीचा असल्याचा ईडीचा दावा आहे.

VIDEO : गोपीनाथ मुंडेंचं अपघातात निधन होऊच शकत नाही - धनंजय मुंडे

First published: February 6, 2019, 8:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading