भाजप कार्यकर्त्याची लॉटरी लागली; काँग्रेस पक्षाने दिली मोठ्या पदाची जबाबदारी

भाजप कार्यकर्त्याची लॉटरी लागली; काँग्रेस पक्षाने दिली मोठ्या पदाची जबाबदारी

राजकारणात एखादं पद मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांना दिवस-रात्र एक करावी लागते. वर्षानुवर्षे नेत्यांच्या मागे फिरुनही अनेकांना साधं पद मिळत नाही.

  • Share this:

जबलपुर, 21 डिसेंबर : मध्य प्रदेशातील राजकारणात नवनवी गोष्टी समोर येत आहेत. राजकारणात एखादं पद मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांना दिवस-रात्र एक करावी लागते. वर्षानुवर्षे नेत्यांच्या मागे फिरुनही अनेकांना लहानसंही पद मिळत नाही. मात्र काही वेळेला तर अपेक्षित नसतानाही एखाद्याला महत्त्वाचं पद दिलं जातं.

एका पक्षाच्या कार्यकत्यांला दुसऱ्या पक्षात नेता बनवलं असं कधी ऐकीवात नाही. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या युवा काँग्रेसमध्ये हर्षित सिंघई (Harshit Singhai) यांना यूथ काँग्रेसचं प्रदेश सचिव पद दिलं आहे. जबलपुरमध्ये (Jabalpur) राहणारे हर्षित यांनी दिग्‍गज नेता ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांच्यासोबत 8 महिन्यांपूर्वी काँग्रेसला रामराम ठोकला होता.

हर्षित सिंघईंनी पत्र लिहून दिली होती माहिती

दिग्गज नेता ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासोबत 8 महिन्यांपूर्वी काँग्रेस सोडताना पार्टी सोडण्याबरोबरच हर्षित यांनी काँग्रेस आणि युवा काँग्रेसच्या सर्व जबाबदार पदाधिकाऱ्यांना पत्र लिहून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून पार्टी सोडत असल्याची माहिती दिली होती. असं असताना 8 महिन्यांनंतर काँग्रेसने त्यांना सचिवपद दिलं गेलं आहे. हर्षित यांच्यानुसार ही छोटी चूक नाही, तर काँग्रेस आणि त्याच्या सहयोगी दलामध्ये होणाऱ्या गोंधळाचा परिणाम आहे.

भाजपने साधला काँग्रेसवर निशाणा

काँग्रेसच्या या चुकीवर भाजप प्रवक्ता जमा खान यांनी निशाणा साधला आहे. त्यांनी काँग्रेसमध्ये सुरू असलेला गोंधळ यामागे कारण असल्याचं सांगितलं आहे. तर ज्योतिरादित्य शिंदे समर्थक हर्षित यांनी काँग्रेस पक्ष सोडला आहे. आणि कोणत्याही परिस्थितीत ते या पदाचा स्वीकार करणे वा काँग्रेसमध्ये पुन्हा जाऊ इच्छित नाही.

निवडणुकांच्या तयारीत कॉंग्रेस गुंतली, पण ...

राज्यात नगरपालिकांच्या निवडणुका व्हाव्यात यासाठी कॉंग्रेसने आखलेले सूत्र अपयशी ठरलेले दिसत आहे. स्थानिक पातळीवर उमेदवारांची निवड केली जाईल आणि जिल्हास्तरावर गठित समितीच्या शिफारशीनुसार उमेदवारांचा निर्णय घेतला जाईल, असे यापूर्वीच कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष कमलनाथ यांनी ठरवले आहे. मात्र जिल्हा कॉंग्रेस कमिटीवर विश्वास न ठेवता उमेदवार पीसीसी कार्यालय व पक्षाच्या नेत्यांभोवती चक्कर मारताना दिसत आहेत. ग्वाल्हेर चंबळ ते मालवा विभागापर्यंतचे उमेदवार पीसीसी गाठून आणि पक्षाच्या नेत्यांना भेटून बायोडाटा देत आहेत. पीसीसीमध्ये माजी मंत्री सज्जनसिंग वर्मा, कॉंग्रेस प्रभारी चंद्रप्रभाष शेखर, पीसीसी प्रभारी राजीव सिंह ते दिग्विजय सिंग यांच्या बंगल्यापर्यंत उमेदवार पोहोचले आहेत. येथे ते आपली उमेदवारी सिद्ध करण्याच काम करत आहेत. माजी उमेदवार सज्जनसिंग वर्मा यांनी सांगितलं की, उमेदवारांच्या निवडीसाठी जिल्हास्तरावर समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. पण जर पीसीसी कार्यालय येत असेल तर ते थांबवता येणार नाही.

Published by: Meenal Gangurde
First published: December 21, 2020, 8:13 AM IST

ताज्या बातम्या