Home /News /national /

भाजप कार्यकर्त्याचा गळफास लावलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, हत्या की आत्महत्या?

भाजप कार्यकर्त्याचा गळफास लावलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, हत्या की आत्महत्या?

या आधी 28 जुलैला पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील हल्दियात भाजपच्या बूथ अध्यक्षांचा मृतदेह अशाच पद्धतीनं गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला होता.

    कोलकाता, 13 सप्टेंबर : भाजप कार्यकर्त्याचा मृतदेह सापडल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे. झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत हा मृतदेह सापडल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. तृणमूल काँग्रेसनं भाजप कार्यकर्त्याची हत्या केल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचे वारे वाहात असल्यानं याचा परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यात रविवारी भाजपा कार्यकर्त्याचा मृतदेह झाडावर गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार भाजप कार्यकर्ता गणेश राय यांचा मृतदेह गोघाट परिसरातील खांटी इथे गावाजवळ झाडाला लटकलेला आढळला. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी गणेशची हत्या केल्याचा आरोप भाजपने केला आहे. राज्यातील सत्ताधारी पक्षाने सर्व आरोप फेटाळले आहेत. हे वाचा-कॉलेज युवकाची निर्घृण हत्या करून झुडपात फेकला मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण गणेश राय शनिवारपासून बेपत्ता होते. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गणेशची हत्या करून हा प्रकार केला आहे. त्यामुळे भाजपमध्ये दहशत पसरवण्याचा त्यांचा हेतू असल्याचा आरोप प. बंगालचे भाजप अध्यक्ष दिलीप घोष यांनी केला. मात्र तृणमूल पक्षाकडून सर्व आरोप फेटाळून लावण्यात आले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव होता मात्र पोलिसांनी त्यावर नियंत्रण मिळवलं असून सध्या ही हत्या आहे की आत्महत्या याचा तपास सुरू आहे. पोलिसांकडून सध्या या परिसरात ज्यादा कुमक तैनात करण्यात आली आहे. हे वाचा-भीषण अपघात गाडीचा झाला चक्काचूर, लोकांना बाहेर काढण्यासाठी आलं हेलिकॉप्टर या आधी 28 जुलैला पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील हल्दियात भाजपच्या बूथ अध्यक्षांचा मृतदेह अशाच पद्धतीनं गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला होता. त्या घटनेपूर्वी भाजप नेते आणि उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील हेमटाबादचे आमदार देवेंद्र नाथ रे यांचा मृतदेह त्यांच्या घराजवळ गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला होता.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या