S M L

#MeToo - पत्रकार काही निरागस नसतात : भाजपच्या महिला नेत्याचं वक्तव्य

परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्यावर महिला पत्रकारांनी केलेल्या छळाच्या आरोपांबाबत विचारलं असता, मध्य प्रदेशच्या भाजप प्रदेशाध्यक्ष लता एलकर यांनी आपल्या पक्षाच्या मंत्र्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसच्या नेत्यावर आरोप झाले असते तर राजीनामा मागितला असता, असंही त्या म्हणाल्या.

Updated On: Oct 11, 2018 08:41 PM IST

#MeToo - पत्रकार काही निरागस नसतात : भाजपच्या महिला नेत्याचं वक्तव्य

सुशील कौशिक, न्यूज 18 मध्य प्रदेश

ग्वाल्हेर, ११ ऑक्टोबर :  ज्येष्ठ पत्रकार आणि परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्यावर महिला पत्रकारांनी केलेल्या छळाच्या आरोपांबाबत विचारलं असता, मध्य प्रदेशच्या भाजप प्रदेशाध्यक्ष लता एलकर यांनी आपल्या पक्षाच्या  मंत्र्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला.

#MeToo मोहीम चुकीची नाही, हे लता एलकर यांनी मान्य केलं. पण भाजप नेते एम. जे. अकबर यांची बाजू उचलून धरत त्या म्हणाल्या, "पत्रकार इतक्याही काही निरागस नसतात की कुणी त्यांचा गैरफायदा घ्यावा."


एम. जे. अकबर हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. असे आरोप काँग्रेसच्या नेत्यावर झाले असते, तर राजीनाम्याची मागणी केली असती. पण भाजपचेच नेते असल्याने राजीनामा मागणार नाही, अशीही पुष्टी लता एलकर यांनी जोडली.

#MeToo मोहिमेतून स्त्रिया पुढे येत अन्यायाविरोधात बोलू लागल्या आहेत, ही चांगली गोष्ट असल्याचं त्यांनी मान्य केलं. आता या प्रकरणाची चौकशी होईल आणि दोषींवर कारवाई होईल, असंही त्या म्हणाल्या.

एम. जे. अकबर हे पत्रकारितेतलं मोठं नाव आहे. ते आता भाजप सरकारमध्ये मंत्रिपदही भूषवत आहेत. त्यांच्यावर काही महिला पत्रकारांनी लैंगिक छळ केल्याचे आरोप केले आहेत.

Loading...
Loading...

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातले महत्वाचे मंत्री एम.जे. अकबर यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप होताहेत. या आरोपांमुळं त्यांच्या राजीनाम्यासाठी सरकारवर दबाव वाढतोय. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांपाठोपाठ आता मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनेही अकबर यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. त्यामुळं पंतप्रधान अकबर यांच्याबाबत कुठला निर्णय घेतात याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलंय.

परराष्ट्र राज्यमंत्री अकबर हे सध्या विदेश दौऱ्यावर आहेत. त्यामुळं ते परत आल्यानंतरच त्यांच्याबाबत पंतप्रधान निर्णय घेतील असा अंदाज विश्वसनीय सूत्रांनी व्यक्त केला. अकबर यांना राजीनामा देण्यास सांगतलं जावू शकतं असाही अंदाज व्यक्त होतोय. तातडीनं काही निर्णय घेतल्यास त्याचा भारताच्या प्रतिमेवर परिणाम होऊ शकतो त्यामुळं अकबर विदेश दौऱ्यावर असेपर्यंत निर्णय घेतला जाणार नाही.

#MeToo या मोहिमेत अकबर यांच्यावर तब्बल सहा महिला पत्रकारांनी लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले होते. आरोप करणाऱ्या सर्व पत्रकार या प्रतिष्ठीत वृत्तपत्रांमध्ये काम करणाऱ्या आहेत. अकबर हे संपादक असतानाच्या त्या सर्व घटना आहेत. चौफेर दबाव वाढत असताना अकबर यांना पदावर ठेवणं हे सरकारला परवडणारं नाही.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा कलंकित मत्र्याला पदावर ठेवणं सरकारला महागात पडू शकते. त्यामुळं सरकारला निर्णय घेणं भाग आहे असा अंदाज राजकीय निरिक्षकांनी व्यक्त केलाय.

अकबर हे 'द टेलिग्राफ', 'एशियन एज' आणि 'द संडे गार्डियन' या वृत्तपत्रांचे संपादक होते. सध्या ते भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत. संपादक असतानाच्या कार्यकाळात नोकरीच्या मुलाखतीसाठी गेलेल्या आणि त्यांच्या काही महिला सहकाऱ्यांनीच त्यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत.

हॉटेलच्या खोलीत बोलावून अश्लील संभाषण करणं, मद्य पिण्यासाठी आग्रह करणं, आक्षेपार्ह शेरेबाजी करणं असे अनेक आरोप एम.जे. अकबर यांच्यावर लावण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 11, 2018 08:40 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close