भाजपने काढला पोटनिवडणुकांचा वचपा; उत्तर प्रदेशात राज्यसभेच्या 10 पैकी 9 जागांवर विजय

भाजपने काढला पोटनिवडणुकांचा वचपा;  उत्तर प्रदेशात राज्यसभेच्या 10 पैकी 9 जागांवर विजय

या फेरीत उत्तर प्रदेश,मध्य प्रदेश ,राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश बिहार,गुजरात, हरियाणा, तेलंगण या राज्यांचा समावेश आहे.

  • Share this:

23 मार्च : राज्यसभेच्या 58 जागांसाठी  झालेल्या निवडणुकांचे निकाल आता लागले आहेत.16 राज्यांमध्ये  झालेल्या या निवडणुकांमध्ये एनडीएने 58 पैकी 28 जागांवर विजय मिळवला असून सगळ्यात महत्त्वाच्या उत्तर प्रदेशातील 10 पैकी 9 जागांवर विजय मिळवला आहे. या विजयात पोटनिवडणूकीत झालेल्या दारूण पराभवाचा वचपाच भाजपने काढला आहे.

58 पैकी 33 जागांवर बिनविरोध निकाल लागला होता.  या फेरीत उत्तर प्रदेश,मध्य प्रदेश ,राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश बिहार,गुजरात, हरियाणा, तेलंगण या राज्यांचा समावेश होता. सध्या राज्यसभेत कुठल्याच पक्षाला बहुमत नाही.  आज 25 जागांसाठी निवडणुका झाल्या होत्या.   या निवडणुकीनंतर भाजप प्रणीत एनडीए बहुमताच्या आणखी जवळ पोचलं आहे.  एनडीएला 28 तर काँग्रेसला 10 जागा  मिळाल्या आहेत.एनडीएकडे 87 युपीएकडे 57 तर इतरांकडे 100 जागा आहेत.

 प्रत्येक राज्यातील जागांवर एक नजर टाकूया

उत्तर प्रदेश-10 पैकी 9 जागांवर भाजपचा एकावर सपाचा विजय

प.बंगाल- 4 जागांवर टीएमसीचा तर 1जागेवर काँग्रेसचा विजय

छत्तीसगड-भाजपचा 1 जागेवर विजय

झारखंड-एका जागेवर भाजपचा तर एकावर काँग्रेसचा विजय

केरळ-या जागेवर एलडीएफने विजय मिळवला आहे

तेलंगणा-टीआरएसचा तिन्ही जागांवर विजय

कर्नाटक-3वर काँग्रेसचा तर एकावर भाजपचा विजय

बिहार-इथे तीन जागांवर एनडीए  एकावर राजद  आणि उरलेल्या जागेवर काँग्रेसचा विजय झाला आहे.

आंध्र प्रदेश-2 जागांवर टीडीपी तर एका जागेवर याआरएसकाँपीचा विजय झाला आहे.

गुजरात-इथे दोन जागांवर भाजप तर दोन जागांवर काँग्रेसचा विजय झाला आहे.

हरयाणा-इथे एका जागेवर भाजपचा विजय

हिमाचल प्रदेश-इथेही एका जागेवर भाजपचा विजय

मध्य प्रदेश-चारवर भाजपचा तर एकवर काँग्रेसचा विजय

ओडिशा-तिन्ही जागांवर बिजू जनता दलचा विजय

राजस्थान- तिन्ही जागांवर भाजपचा विजय

First published: March 23, 2018, 3:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading