हिमाचलमध्ये कमळ उमललं, काँग्रेसला पराभवाचा धक्का

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Dec 18, 2017 12:18 PM IST

हिमाचलमध्ये कमळ उमललं, काँग्रेसला पराभवाचा धक्का

18 डिसेंबर :  एकीकडे सगळ्या देशाचं लक्ष गुजरातच्या निकालाकडे लागलं असतानाच दुसरीकडे  हिमाचल प्रदेशचं चित्र स्पष्ट झालं आहे. भाजपने बहुमताचा आकडा सहज पार करत सत्ता काबीज केली आहे.

हिमाचल प्रदेशच्या मतमोजणी केंद्रावर  आज सकाळी  8 वाजताच्या सुमारास मतमोजणीला सुरूवात झाली. सुरूवातीपासूनच कल भाजपकडे झुकलेला होता. नंतर  भाजपनेही आघाडी कायम ठेवली असून आता  39 जागांवर भाजप आघाडीवर आहे. त्यामुळे त्यांचा विजय हा निश्चितच मानला जातोय.तर दुसरीकडे काँग्रेसला मात्र पराभवाचा सामना करावा लागत असून  गेल्या वेळच्या तुलनेत तब्बल 10हून  अधिक जागा कमी झाल्या आहेत . 2012 साली काँग्रेसला 36 तर भाजपला 26 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे यावेळी भाजपला  35 हा बहुमताचा आकडा अगदी सहज पार करत आला आहे.  तर अपक्ष पाच जागांवर आघाडीवर आहेत.

हिमाचल प्रदेशमध्ये एकदा जिंकलेला पक्ष पुन्हा कधीच सत्तेत येत नाही. गेल्या 32 वर्षांपासूनही परंपरा कायम आहे. त्यामुळे एकदा भाजप तर एकदा  काँग्रेस सत्तेत येते. यावेळी पुन्हा भाजप सत्तेत येईल असं चित्र स्पष्ट झालंय. पण भाजपचे माजी मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार प्रेम कुमार धुमर मात्र पिछाडीवर आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह मात्र आघाडीवर आहेत.

हिमाचल प्रदेश या राज्याचा  मानव विकास निर्देशांक खूप अधिक आहे. या राज्यात  उघड्यावर शौचास बसण्याचे प्रमाणही कमी आहे. तसंच इथला मतदारही खूप सजग आहे. यंदा पंतप्रधान मोदींनीही हिमाचल प्रदेशमध्ये प्रचार केला होता. गेल्या महिन्यात हिमाचल प्रदेशमध्ये एका टप्प्यात मतदान झालं. मतदानाचं प्रमाण  74% होतं.

एकंदर आता हिमाचलमध्ये भाजपला विजय मिळाल्याने  देशातील निम्म्याहून अधिक भुभागावर भाजपची सत्ता स्थापन झाली आहे.

Loading...

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 18, 2017 12:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...