साध्वी प्रज्ञासिंग यांच्या शपथविधीवरून वाद, विरोधकांचा आक्षेप

शपथ घेतांना त्यांनी आपलं नाव साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर पूर्णचेतनानन्द अवधेशानंद गिरी असं घेतलं त्यानंतर वादाला सुरुवात झाली.

News18 Lokmat | Updated On: Jun 17, 2019 07:19 PM IST

साध्वी प्रज्ञासिंग यांच्या शपथविधीवरून वाद, विरोधकांचा आक्षेप

नवी दिल्ली 17 जून : भाजपच्या भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर या खासदारपदाची शपथ घेताना लोकसभेत गोंधळ झाला. काँग्रेससहीत विरोधी पक्षांनी जोरदार गोंधळ घालत साध्वींच्या शपधविधीला हरकत घेतली. त्यानंतर हंगामी अध्यक्षांनी हस्तक्षेप केल्याने गोंधळ शांत झाला. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळातही साध्वींच्या वक्तव्यांनी अनेक वाद निर्माण झाले होते. नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही साध्वींना समज देत वादात पडू नका अशी ताकीद दिली होती.

नवनिर्वाचित संसदेच्या पहिल्या सत्राला आजपासून सुरुवात झाली. लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर खासदारांच्या शपथविधीला सुरुवात झाली. सर्वात पहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली. त्यानंतर क्रमाने खासदारांचा शपथविधी सुरू झाला. साध्वी प्रज्ञासिंग यांनी संस्कृतमधून शपथ घेतले. शपथ घेतांना त्यांनी आपलं नाव साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर पूर्णचेतनानन्द अवधेशानंद गिरी असं घेतलं त्यानंतर वादाला सुरुवात झाली.

त्यांनी वेगळं नाव घेतलं असा आक्षेप विरोधकांनी घेतला. त्यानंतर लोकसभेचे कर्मचारी साध्वींनी फॉर्ममध्ये नेमकं काय नाव लिहिलं त्याचा शोध घेऊ लागले. नंतर हंगामी अध्यक्ष वीरेंद्र कुमार यांनी निर्णय दिला की साध्वींनी जे नाव आपल्या निवडणुक प्रमाण पत्रात लिहिलंय तेच नोंदवलं जावं त्यानंतर वाद निवळला.

राहुल गांधींनी घेतली शपथ

दिल्लीत विविध बैठकांचं सत्र दिल्लीत सुरू असताना राहुल मात्र या बैठकांना उपस्थित नव्हते. आठवडाभरापूर्वी राहुल हे वायनाड या आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर गेले होते. तिथे तीन दिवसांमध्ये त्यांनी विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. त्यानंतर ते लंडनला सुट्टीसाठी गेले होते, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. आठवडाभर लंडनमध्ये राहून सोमवारी 17 जूनला सकाळी ते दिल्लीत परतले.

Loading...

दिल्लीत आल्यानंतर दुपारी ते लोकसभेत पोहोचले आणि खासदारकीची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर राहुल गांधी स्वाक्षरी न करताच जात होते तेव्हा राजनाथ सिंग यांनी त्यांना स्वाक्षरी करायची आठवण करुन दिली. यावेळी पंतप्रधान मोदी उपस्थित नव्हते.

राहुल गांधींनी लोकसभेच्या प्रचारात प्रचंड मेहनत घेतली होती. त्यानंतर पराभवाची जबाबदारी घेत त्यांनी राजनामा देण्याची घोषणा करत नवा अध्यक्ष निवडावा असं ज्येष्ठ नेत्यांना  सांगितलं होतं. मात्र सर्वच नेत्यांनी त्यांचा राजीनामा फेटाळत त्यांनाच पदावर राहण्याचा आग्रह धरला. काँग्रेसला एका मोठ्या शस्त्रक्रियेची गरज असून राहुल गांधीच त्यासाठी योग्य आहेत असं मत ज्येष्ठ नेते विरप्पा मोईली यांनी व्यक्त केलंय.

राहुल गांधी हे आपल्या राजीनाम्यावर ठाम असल्याने ते काँग्रेसच्या बैठकांना उपस्थित राहणार नाहीत अशी माहितीही सूत्रांनी दिलीय. त्यांच्या अनुपस्थित ज्येष्ठ नेते ऐ. के. अॅण्टनी हे अध्यक्षस्थानी असणार आहेत.बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 17, 2019 07:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...