अक्षय कुडकेलवार, मुंबई, 19 मे : लोकसभा निवडणुकीचा निकाल आता अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपला आहे. सर्वच एक्झिट पोलमध्ये पुन्हा एकदा भाजप सरकार येणार असा अंदाज वर्तवला जात आहे. परंतु, सट्टा बाजारानेही भाजपलाच जास्त जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. भाजपला 245 ते 248 जागा मिळतील तर काँग्रेसला 75 ते 78 जागा मिळतील, असं भाकित वर्तवलं आहे.
भाजप सरकार जर बहुमतात आलं तर त्यासाठी 3.50 रुपये भाव आहे. तर तिथेच एनडीए सरकारला 12 पैसे भाव आहे. काँग्रेस सरकारला 100 रुपये भाव आहे. तर यूपीए सरकारला 50 रुपये भाव देण्यात आला आहे. तसंच सपा आणि बसपाच्या महागठबंधनला 80 रुपये भाव देण्यात आला आहे.
तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 15 पैसे दर देण्यात आला आहे. राहुल गांधी यांना 50 रुपये, मायावती 100 आणि ममता बॅनर्जी यांना 150 रुपये भाव देण्यात आला आहे.
तसंच काही उमेदवारांवरही विजयाचा दर निश्चित करण्यात आला आहे. काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर, बिहारमधून शत्रुघ्न सिन्हा, पुनम सिन्हा पराभूत होतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह आणि मध्य प्रदेशमधून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर विजयी होणार असा दावा सट्टा बाजारातून करण्यात आला आहे.
सट्टा बाजाराचा अंदाज
भाजप : 245-248
काँग्रेस : 75-78
सट्टा बाजाराचा भाव
भाजप सरकार - 3.50 रुपये
एनडीए - 12 पैसे
काँग्रेस सरकार 100 रुपये
यूपीए - 50 रुपये
महागठबंधन - 80 रुपये
नरेंद्र मोदी - 15 पैसे
राहुल गांधी - 50 रुपये
मायावती -100 रुपये
ममता बॅनर्जी -150 रुपये
==========================================