Loksabha Election 2019 : भाजपला उत्तर प्रदेशमध्ये बसणार हादरा?, काय म्हणतोय सर्व्हे जाणून घ्या

Loksabha Election 2019 : भाजपला उत्तर प्रदेशमध्ये बसणार हादरा?, काय म्हणतोय सर्व्हे जाणून घ्या

2014च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये ऐतिहासिक 73 जागा मिळवणाऱ्या भाजपला यंदा मात्र मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 मार्च: केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. या घोषणेसह देशात आचारसंहिता लागू झाली आहे. लोकसभेतील जागांचा विचार करता उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक 80 जागा आहेत. त्यामुळेच दिल्लीतील सत्तेचा मार्ग हा उत्तर प्रदेशमधून जातो असे म्हटले जाते. भाजपने 2014मध्ये मिळवलेल्या ऐतिहासिक विजयात उत्तर प्रदेशचा मोठा वाटा होता. भाजपने तेव्हा 80 पैकी 73 जागांवर विजय मिळवला होता. यंदा उत्तर प्रदेशमध्ये 7 टप्प्यात 11 एप्रिल ते 19 मेपर्यंत मतदान होणार आहे.

वाचा: #BattleOf2019 या APP वर तुम्ही करू शकता निवडणुक आयोगाकडे तक्रार

उत्तर प्रदेशमध्ये कोणाला किती जागा मिळणार

एबीपी आणि सी-व्होटर्स यांनी केलेल्या सर्व्हेनुसार यंदा सत्तधारी भाजपला उत्तर प्रदेशमध्ये मोठा धक्का बसणार आहे. राज्यात NDAला 41 टक्के तर महाआघाडीला 43 टक्के मते मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे. जागांचा विचार केल्यास भाजपला केवळ 29 जागा तर सपा-बसपा आघाडी आणि महाआघाडीला 47हून अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील UPAला केवळ 4 जागा मिळण्याची शक्यता आहे. या सर्व्हेनुसार 2014च्या तुलनेत NDAला 44 जागांचे नुकसान होणार आहे.

हे देखील वाचा: आयोगाने 'राहु काळा'त घेतली पत्रकार परिषद, अनेक नेत्यांना फुटला घाम

लोकसभा निवडणुकीचा आतापर्यंतचा इतिहास पाहिल्यास ज्या पक्षाला उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक जागा मिळतात तोच पक्ष दिल्लीत सत्ता स्थापन करतो. उत्तर प्रदेशमधील विजयाचा आवाज दिल्लीत ऐकू येतो असे म्हटले जाते. सर्व्हेनुसार राज्यात मायावती, अखिलेश यादव आणि अजित सिंह यांची आघाडी भाजपच्या नेतृत्वाखालील NDAवर वरचढ ठरू शकते.

कोण किती जागा लढवणार

राज्यात मायावती यांचा बसपा 38 जागांवर, अखिलेश यादव यांचा सपा 37 जागांवर तर आरएलडी 3 जागांवर लढणार आहे. राज्यातील या महाआघाडीने काँग्रेससाठी दोन जागा सोडल्या आहेत. यात रायबरेली आणि अमेठी या मतदारसंघाचा समावेश आहे.

वाचा- Loksabha Election 2019 : भाजपला बसू शकतो धक्का, एनडीएला संपूर्ण बहुमत नाही - सर्व्हे

2014मध्ये भाजपने मिळवला होता ऐतिहासिक विजय

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने उत्तर प्रदेशमध्ये विक्रमी 73 जागा मिळवल्या होत्या. सपाला 5 जागा तर काँग्रेसला 2 जागांवर विजय मिळवता आला होता.

VIDEO: 'आता मतदारच करतील तिसरं सर्जिकल स्ट्राईक', मुंबईत सुषमा स्वारज यांची गर्जना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 10, 2019 08:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading