NaMo Vs RaGa : तरुणांना आकर्षित करण्यासाठी भाजपचं ‘Nation with NaMo’

NaMo Vs RaGa : तरुणांना आकर्षित करण्यासाठी भाजपचं ‘Nation with NaMo’

भाजपच्या युवा मोर्चाच्या प्रमुख खासदार पूनम महाजन यांना नव मतदारांना पक्षाशी जोडण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 31 डिसेंबर : निवडणुका या लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असल्या तर राजकीय पक्षांसाठी ही जीवन मरणाची लढाई असते. त्यामुळे आपली सर्व शक्ती ते या निवडणुकीत पणाला लावतात. कारण एकदा संधी गेल्यानंतर पुन्हा पाच वर्ष वाट पाहण्याशिवाय पर्याय नसतो. तरुणांना आकर्षित करण्यासाठी भाजप ‘Nation with NaMo’  ही मोहीम सुरू करणार आहे.

भाजपच्या युवा मोर्चाच्या प्रमुख खासदार पूनम महाजन यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. महिला, अनुसुचित जाती-जमाती, दलित आदिवासी, तरुण, तसच समाजातल्या विविध घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपने खास योजना तयार केलीय. त्याचाच एक भाग म्हणून भाजपच्या खासदार पुनम महाजन यांना एक 14 सूत्री कार्यक्रमाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

जे पहिल्यांदाच मतदान करणारे तरुण, तरुणी आहेत त्यांचा पाठिंबा मिळविण्याचं काम त्याच्या नेतृत्वाखाली होणार आहे. यासाठी येत्या 12 जानेवारीपासून ‘Nation with NaMo’ ही मोहीम सुरू होणार आहे. यात नवीन मतदार, तरुण उद्योजक, व्यावसायिक, टेक्नोक्रॅट, विद्यार्थी अशा सगळ्यांशी संपर्क साधून त्यांना आपल्याकडे वळविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

त्याचबरोबर 'पहिलं मत मोदींना' ही मोहीमही भाजप राबविणार आहे. जे नव मतदार आहेत त्यांनी पहिल्यांदा मत देताना ते मोदींना म्हणजेच भाजपला द्यावं असं आवाहन भाजप करणार आहे. मोदींना मत म्हणजे विकासाला मत असं भाजपला ठसवायचं असून काहीच काम झालं नाही हा काँग्रेसचा आरोप खोडून काढायचा आहे.

2014 मध्ये विकासाची नव्याने सुरूवात झाली. तो विकासाचा प्रवाह कायम ठेवायचा असेल तर मोदींनाच मत द्या असा भाजप आग्रह धरणार आहे.

VIDEO : भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणातील 'ती' कोण? पहिल्यांदाच कॅमेरात कैद

First published: January 1, 2019, 6:48 AM IST

ताज्या बातम्या