भाजपमध्ये अनेकांचे पत्ते कट, संधी मिळणारे 'ते' नवीन चेहरे कोण?

भाजपमध्ये अनेकांचे पत्ते कट, संधी मिळणारे 'ते' नवीन चेहरे कोण?

भाजप आता नवीन चेहऱ्यांना संधी देण्याच्या विचारात आहे. त्यामुळे कुणाचे पत्ते कट होणार हे पाहावं लागणार आहे.

  • Share this:

दिल्ली, 14 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी आता भाजपनं देखील तयारी सुरू केली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपा नवीन चेहऱ्यांना संधी देणार आहे. सोलापूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया, नांदेड, हिंगोली आदी लोकसभा मतदारसंघात नवीन चेहर्‍यांना संधी देण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. त्यामुळे काही विद्यमान खासदाराचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 16 मार्चला भाजप उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होणार असून राज्यातील उमेदवारांच्या नावावर चर्चा होणार आहे. उमेदवारांची निवड करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं देखील लक्ष घातलं आहे. त्यामुळे अनेक नवीन चेहरे हे भाजपच्या वतीनं लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचं आता बोललं जात आहे.

LokSabha Elections : काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, हे आहेत महाराष्ट्रातील 5 उमेदवार

खासदारांच्या कामगिरीचा घेतला आढावा

दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजपनं खासदारांच्या कामगिरीचा आढावा घेतला होता. त्यांच्या कामांचं मुल्यमापन केलं होतं. परिणामी आता पत्ते कट होणारे ते खासदार कोण? अशी चर्चा आता रंगली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपनं राज्यातून 45 जागा निवडून आणण्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे. 2014मध्ये शिवसेना - भाजप युतीला 42 जागा जिंकता आल्या होत्या. उत्तर प्रदेशमध्ये भाजपला 2014 प्रमाणे यश मिळेल का नाही? याबद्दल शंका आहे. त्यामुळे आता भाजपनं देशातील उर्वरित राज्यांमध्ये लक्ष केंद्रीत केलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून नवीन चेहऱ्यांना संधी मिळू शकते.

सध्या अनेक पक्षांमध्ये जोरदार घडामोडी घडताना दिसत आहे. काँग्रेसनं देखील आपल्या काही उमेदवारांची नावं यापूर्वी जाहीर केली आहेत. दरम्यान, लवकरच भाजप देखील उमेदवारांची नाव जाहीर करणार आहे.

VIDEO: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी निश्चित?

First published: March 14, 2019, 11:57 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading