विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करणार का? दानवेंचं हे आहे उत्तर

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करणार का? दानवेंचं हे आहे उत्तर

'जावई हर्षवर्धन जाधव पडल्याचे दुःख नाही तर युतीची एक जागा कमी झाल्याचे दुःख आहे.'

  • Share this:

विवेक कुलकर्णी 24 मे: लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर आता चर्चा सुरू झाली ती राज्यात विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेनेसोबत युती करणार का? याची. याही वेळी 2014 सारखीच परिस्थिती निर्माण झालीय. त्यावेळी लोकसभेत घवघवीत यश मिळाल्यानंतर भाजपने विधानसभेत जास्त जागांची मागणी करत काडीमोड घेतला होता.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 2014 पेक्षाही जास्त बहुमत मिळालं. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काय होणार असा प्रश्न पुन्हा एकदा विचारला जातोय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी त्यावर भाजपची भूमिका स्पष्ट केली. पुन्हा युती करताना जो फॉर्म्युला ठरला होता त्यावर आम्ही ठाम असल्याचं ते म्हणाले.

युती घट्ट आहे

लोकसभा निवडणुकीआधी साडेचार वर्ष झाल्यानंतर भाजप शिवसेनेची पुन्हा युती झाली. ही युती करताना विधानसभेत दोनही पक्षांना प्रत्येकी 50 टक्के जागांचं सूत्र ठरलं होतं. म्हणजे अर्ध्या, अर्ध्या  जागांवर दोनही पक्ष लढणार आहेत. तसेच सत्तेचं समान वाटप असंही त्यावेळी ठरलं होतं. लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही भाजप-सेनेला उत्तम यश मिळेल असंही त्यांनी सांगितलं.

महाराष्ट्रात युतीने  48 जागांपैकी तब्बल 41 जागांवर ताबा मिळवला. त्यात भाजपला 23 तर शिवसेनाला 18 जागा मिळाल्या. काँग्रेसला फक्त 1 जागेवर समाधान मानावं लागलं. तर राष्ट्रवादीला 6 जागा मिळाल्या.

जावई पडल्याचं दु:ख नाही

रावसाहेब दानवे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्यात १ तास झाली चर्चा. राज्यातील लोकसभा निवडणुकीचा निकाल आणि विधानसभा निवडणूकीविषयीची रणनीती यावर चर्चा झाल्याची माहिती आहे.

औरंगाबाद मधून जावई हर्षवर्धन जाधव पडल्याचे दुःख नाही तर युतीची एक जागा कमी झाल्याचे दुःख आहे असं ते म्हणाले. महाराष्ट्राच्या प्रत्येक जागेवर नरेंद्र मोदी उभे असे आम्ही समजत होतो. त्यामुळे औरंगाबादची युतीची एक जागा कमी झाली याचे दुःख अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली. उद्या राज्यातल्या भाजपच्या नवनिर्वाचित खासदारांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही दिल्लीला जाणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 24, 2019 05:29 PM IST

ताज्या बातम्या