राहुल गांधींच्या राजीनाम्यावर भाजपनं दिली ही पहिली प्रतिक्रिया

राहुल गांधींच्या राजीनाम्यावर भाजपनं दिली ही पहिली प्रतिक्रिया

'भाजप आणि काँग्रेसमध्ये मुलभूत पक्ष असून भाजप हा लोकशाहीच्या तत्वांवर चालणारा पक्ष आहे तर काँग्रेस घराणेशाहीच्या मुल्यांवर.'

  • Share this:

नवी दिल्ली, 3 जुलै : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे अखेर आज काँग्रेस अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाले. काँग्रेस कार्यकारीणीच्या सदस्यांना पत्र लिहून त्यांनी राजीनामा देत असल्याचं सांगत पराभवाची जबाबदारीही घेतली. काँग्रेसच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण हा निर्णय घेत असल्याचंही त्यांनी सांगितलं. राहुल गांधी यांच्या या निर्णयावर भाजपने आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केलीय. काँग्रेस हा एका कुटुंबाच्या तालावर चालणारा पक्ष असल्याची प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते नलिन कोहली यांनी व्यक्त केलीय. भाजप आणि काँग्रेसमध्ये मुलभूत पक्ष असून भाजप हा लोकशाहीच्या तत्वांवर चालणारा पक्ष आहे तर काँग्रेस घराणेशाहीच्या असंही ते म्हणाले.

राहुल यांच्या राजीनाम्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झालीय. राहुल हे काँग्रसेचे अध्यक्ष असले काय किंवा नसले काय काही फरक पडत नाही. तेच आम्हाला कायम मार्गदर्शक आणि प्रेरणा देणारा राहतील असं मत ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी व्यक्त केलंय.

विधानसभेसाठी वंचितने काँग्रेसला दिला आघाडीचा फॉर्म्युला, 'इतक्या' जागा लढवणारच!

91 वर्षाचे नेते काँग्रेसचे अध्यक्ष

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी राजीनामा दिल्यानंतर आता नव्या अध्यक्षांच्या निवडीवरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. याआधी, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचं नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर होतं. पण आता या निवडीमध्ये नवा ट्विस्ट आला आहे.

'मी काही आता पक्षप्रमुख नाही, काँग्रेसने लवकर नवा अध्यक्ष निवडावा'

एका इंग्रजी चॅनलने दिलेल्या वृत्तानुसार जोपर्यंत नव्या अध्यक्षांच्या नावावर सहमती होत नाही तोपर्यंत मोतीलाल व्होरा हे काँग्रेसचे हंगामी अध्यक्ष असतील. मोतीलाल व्होरा हे 91 वर्षांचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारीही सांभाळली आहे.

याआधी सोनिया गांधींनी सुशीलकुमार शिंदेंना अध्यक्षपदासाठी फोन केल्याची बातमी होती. अध्यक्षपदाच्या यादीत सुशीलकुमार शिंदे, राजीव सातव अशी नावं होती. पण आता सुशीलकुमार शिंदे यांचं नावही वेटिंग लिस्टमध्येच गेल्याचं दिसतं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 3, 2019 05:30 PM IST

ताज्या बातम्या