भाजपची वेबसाइट झाली हॅक, उघडताच दिसू लागले अश्लील शब्द

भाजपची वेबसाइट हॅक झाल्यानंतर त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीच्या चान्सलर एंजेला मर्केल यांचा एक व्हिडिओ दिसत होता.

News18 Lokmat | Updated On: Mar 5, 2019 01:16 PM IST

भाजपची वेबसाइट झाली हॅक, उघडताच दिसू लागले अश्लील शब्द

नवी दिल्ली, 5 मार्च : भाजपची अधिकृत वेबसाइट (http://www.bjp.org/) हॅक करण्यात आली आहे. तसंच वेबसाइट हॅक केल्यानंतर हॅकरने तिथं अश्लील भाषाही वापरली आहे. याबाबत भाजपकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

भाजपची वेबसाइट सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी ओपन केल्यानंतर त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीच्या चान्सलर एंजेला मर्केल यांचा एक व्हिडिओ दिसत होता. या व्हिडिओवर काही अश्लील शब्दांचाही वापर करण्यात आल्याचं पाहायला मिळालं.

वेबसाइट हॅक झाल्यानंतर काही वेळात ही साइट बंद झाली आहे. सर्च केल्यावर एरर असा मेसेज दिसत आहे.

दरम्यान, यानंतर काँग्रेस आयटी सेलने ट्वीटवरून भाजपची खिल्ली उडवली आहे. 'वेबसाइट की रक्षा नहीं कर सकते, देश की क्या करेंगे', असं या ट्वीटमध्ये म्हणण्यात आलं आहे.


Loading...VIDEO : पोलिसाला मारहाण करणाऱ्या भाजप कार्यकर्त्याची कपडे फाटेपर्यंत धुलाईबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 5, 2019 12:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...