भाजपच्या जाहीरनाम्यात मंगळसूत्र ते मोफत स्मार्टफोनपर्यंत घोषणांची खैरात

भाजपच्या जाहीरनाम्यात मंगळसूत्र ते मोफत स्मार्टफोनपर्यंत घोषणांची खैरात

येडियुरप्पा यांच्या उपस्थितीत जाहीरमाना प्रसिद्ध झाला. तसंच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि स्मृती इराणीही आज कर्नाटकात आहे. त्यामुळे कर्नाटकमध्ये खऱ्या अर्थानं प्रचार शिगेला पोहोचला आहे.

  • Share this:

04 मे : कर्नाटकमध्ये खऱ्या अर्थानं प्रचार शिगेला पोहोचला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आज कर्नाटकात आहे. राहुल गांधींच्या कर्नाटकात चार ठिकाणी प्रचारसभा घेणार. दुपारी 12:30च्या सुमारास राहुल गांधी कलबुर्गीला भेट देणार आहे तर आज सकाळी 10 वाजता भाजपचा जाहीरनामा सुद्धा प्रसिद्ध झाला आहे.

येडियुरप्पा यांच्या उपस्थितीत जाहीरमाना प्रसिद्ध झाला. तसंच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि स्मृती इराणीही आज कर्नाटकात आहे. त्यामुळे आता कर्नाटक निवडणुकांकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे.

भाजपच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाचे मुद्दे

- 1 हजार शेतकऱ्यांना दरवर्षी मुख्यमंत्री शिष्यवृत्ती

- रायता बंधू शिष्यवृत्ती सुरू करणार, शेतकऱ्यांच्या मुलांसाठी 100 कोटी तरतूद

- 1 लाखापर्यंत कर्जमाफी करणार, पहिल्या कॅबिनेट मध्ये निर्णय घेणार

- डेअरी फार्मिंग आणि जनावरांच्या वाढीसाठी कामधेनू निधी, 3 हजार

कोटींची तरतूद करणार

- दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना स्मार्टफोन देणार, मुख्यमंत्री स्मार्टफोन

योजना

- राज्यात पाणीपुरवठा योजनांसाठी दीड लाख कोटींची तरतूद

करणार

- दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील महिला आणि विद्यार्थीनींना फ्री

सॅनिटरी नॅपकिन

- महिलांना २ लाखांपर्यंतचं कर्ज फक्त १ टक्का व्याजाने देणार

- दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील सर्व महिलांना मोफत स्मार्टफोन

- महिलांना एक रुपयांत सॅनिटरी नॅपकीन

- महिलांच्या उन्नतीसाठी १० हजार कोटींचा निधी

- भूमिहीन शेतकऱ्यांसाठी २ लाख रुपयांची विमा योजना

- अनुसूचित जमातीच्या ४०० मुलांना शिक्षणासाठी परदेशी पाठवणार

- २४x७ भ्रष्टाचारविरोधी हेल्पलाइन

- प्रत्येक तालुक्यात रनिंग ट्रॅक आणि स्वीमिंग पूल

First published: May 4, 2018, 12:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading