'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट

'भाजपपासून माझ्या पतीच्या जिवाला धोका'; माजी मुख्यमंत्र्यांनी केलं ट्वीट

भाजप विष देऊन माझ्या पतीला मारून टाकेल, असं ट्वीट करून बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांनी खळबळ उडवून दिली आहे.

  • Share this:

पाटणा, 20 एप्रिल : बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांनी आपल्या पतीच्या जिवाला धोका असल्याचं ट्वीट करून खळबळ उडवून दिली आहे. लालूप्रसाद यादव चारा घोटाळ्याप्रकरणी शिक्षा भोगत आहेत. त्यांची प्रकृती ठीक नसल्याच्या कारणाने रुग्णालयात ते उपचार घेत आहेत. तिथे त्यांच्या जिवाला धोका असल्याचं राबडीदेवींचं म्हणणं आहे.

न्यायालयाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे लालूप्रसाद यांना भेटायला दर शनिवारी तीन व्यक्तींना परवानगी मिळू शकते, पण भाजपप्रणित सरकारच्या 'तानाशाही'मुळे त्यावरही बंदी घालण्यात आल्याचा राबडीदेवी यांनी दावा केला आहे.

आपल्या मुलालाही वडिलांना भेटू दिलं जात नाही. ही विषारी माणसं लालूंविरोधात कट करत आहेत. त्यांच्या जिवाला धोका आहे, असं राबडीदेवी यांनी म्हटलं आहे.

राबडीदेवी यांनी कारागृहाच्या नोटिसबोर्डवर लावलेल्या सूचनेचा फोटोही ट्वीट केला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करता 20 एप्रिलला लालूप्रसाद यादव यांना भेटता येणार नाही, असं या सूचनेमध्ये लिहिलं आहे.

First Published: Apr 20, 2019 08:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading