S M L

कर्नाटकात भाजपचा आणखी एक पराभव, काँग्रेसच्या मुनिरत्न यांचा मोठा विजय

कर्नाटकच्या राजराजेश्वरी नगरमध्ये काँग्रेसच्या मुनिरत्न यांचा 41162 मतांनी विजय झाला आहे. त्यांनी भाजपच्या मुनिराज गौडा पीएस यांचा पराभव केला आहे.

Sachin Salve | Updated On: May 31, 2018 05:33 PM IST

कर्नाटकात भाजपचा आणखी एक पराभव, काँग्रेसच्या मुनिरत्न यांचा मोठा विजय

कर्नाटक, ता. 31 मे : कर्नाटकच्या राजराजेश्वरी नगरमध्ये काँग्रेसच्या मुनिरत्न यांचा 41162 मतांनी विजय झाला आहे. त्यांनी भाजपच्या मुनिराज गौडा पीएस यांचा पराभव केला आहे.

कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीत राजराजेश्वरी नगर आणि आरआर नगरमध्ये फेरमतदान झालं आहे. यात काँग्रेसने विक्रमी आघाडी घेतली आणि भाजपचा पराभव केला. 2013 मध्येही च्या निवडणुकीतही काँग्रेसने ही जागा जिंकली होती.

राजराजेश्वरी नगर आणि आरआर नगर, कर्नाटक (विधानसभा) बंगळुरू शहर जिल्ह्यात हा मतदार संघ येतो. नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत या मतदार संघात मोठ्या प्रमाणावर बनावट निवडणूक ओळखपत्रं सापडल्याने ही निवडणूक लांबणीवर टाकण्यात आली होती. 4,54,909 एवढे मतदार या मतदार संघात आहेत.

आतापर्यंत कोणत्या जागांचे निकाल लागले आहेत पाहुयात...

- पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या श्रीनिवास वनगा यांना मागे टाकत भाजपच्या राजेंद्र गावित यांचा विजय

- भंडारा-गोंदियामध्ये लोकसभा पोटनिवडणुकांत राष्ट्रवादीच्या मधुकर कुकडे यांचा विजय. भाजपचे उमेदवार हेमंत पटले यांचा दारुण पराभन.

- केरळच्या चेंगान्नुर विधानसभा पोटनिवडणुकीत सीपीआईएम उमेदवार साजी चेरियन यांचा 20956 मतांनी विजयी- उत्तर प्रदेशच्या नूरपुर विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये समाजवादी पार्टीच्या नईमुल हसन यांचा 6211 मतांनी विजय

- बिहारच्या जोकीहाटमध्ये लालू प्रसाद यादव यांच्या पार्टीचे आरजेडी यांचा 76002 मतांनी विजय तर जेडीयूच्या पारड्यात 37913 मतं

- मेघालय विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय. काँग्रेसचे उमेदवार मियानी डी शिरा यांनी एनपीपीचे उमेदवार क्लेमेंट जी मोमिन यांना केलं पराभूत

- झारखंडमध्ये सिल्ली विधानसभा पोटनिवडणुकांमधून जेएमएमच्या सीमा देवी यांचा विजय. आजसूच्या सुदेश महतो यांचा पराभव.

- झारखंड मुक्ति मोर्चाच्या उमेदवार बबिता महतो यांचा झारखंडच्या गोमियामध्ये 1344 मतांनी विजय. भाजपच्या माघवलाल सिंह यांचा केला पराभव

- पंजाबच्या शाहकोट विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसचे उमेदवार हरदेव सिंह यांनी मारली बाजी. 38802 मतांनी शिरोमणि अकाली दलच्या नायब सिंह यांचा केला पराभव

- भाजपने उत्तराखंडच्या विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये आपला झेंडा रोवला आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा हा पहिला विजय आहे.

- पश्चिम बंगालच्या महेशतला विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये तृणमूल काँग्रेसच्या दुलाल चंद्र दास यांचा विजय.

- उत्तर प्रदेशच्या कैराना लोकसभा पोटनिवडणुकांमध्ये आरएलडी उमेदवार तबस्सुम हसन यांचा विजय. भाजपच्या उमेदवार मृगांका सिंह यांचा 50,000 मतांनी केला पराभव

- नागालँड राज्याच्या लोकसभा निवडणुकांचे अंतिम निकाल हाती लागले आहेत. नागालँडमध्ये एनपीएफ विजयी ठरला आहे. एनपीएफचे उमेदवार सी अपोक जमीर यांनी 392827 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी एनडीपीपीच्या तोखेहो यांचा पराभव केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 31, 2018 11:01 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close