S M L

भाजपचा उद्या स्थापना दिवस ; मुंबईत होणार शक्तीप्रदर्शन

भाजपचा उद्या 38वा स्थापना दिन आहे .त्यानिमित्त मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन होणार आहे.

Chittatosh Khandekar | Updated On: Apr 5, 2018 10:22 PM IST

भाजपचा  उद्या स्थापना दिवस ; मुंबईत होणार  शक्तीप्रदर्शन

05 एप्रिल : भाजप स्थापनादिनाचं औचित्य साधत उद्या 6 एप्रिल रोजी बीकेसी मैदानावर पक्षाचं जोरदार शक्तीप्रदर्शन होणार  आहे. 6 एप्रिल 1980 साली भाजपची स्थापना झाली होती.

भाजपचा उद्या 38वा स्थापना दिन आहे .त्यानिमित्त मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन होणार आहे. भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल झाले आहेत. कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा उद्या वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आयोजित करण्यात आला आहे.

हा मेळावा उद्या सकाळी होणार असला तरी आज रात्री  भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत भाताच्या राज्य कोअर टीमची बैठक सुरू झालीय. मुंबईच्या बांद्रा कुर्ला परिसरात हॉटेल सोफिटेल येथे सुरू झाली आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष  रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार हे या बैठकीला उपस्थित आहेत. भाजप उद्याच्या मेळाव्याची तयारी, मंत्रिमंडळ विस्तार बाबत आढावा, राज्यात पक्षच्या कार्यालय बांधकामना होत असलेली दिरंगाई, बूथ रचना बाबत या बैठकीत चर्चा होते आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 5, 2018 10:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close