केरळमध्ये राजकीय हिंसाचाराविरोधात भाजपची पदयात्रा

केरळमध्ये  राजकीय हिंसाचाराविरोधात भाजपची पदयात्रा

या पदयात्रेत अमित शहा आणि योगी आदित्यनाथ सहभागी होत आहेत. तर दिल्लीत भाजप कार्यकर्ते कम्युनिस्ट कार्यालवर मोर्चा काढणार आहेत. देशभरातील कार्यकर्ते सुद्धा केरळमधे जाऊन आंदोलन करणार आहेत.

  • Share this:

04 ऑक्टोबर: केरळमध्ये होणाऱ्या राजकीय हिंसाचारामुळे सत्तारूढ डाव्या आघाडी सरकार विरोधात संघ परिवार अतिशय आक्रमक झाला आहे. आजपासून भाजपाचे सगळे नेते केरळ मध्ये हत्यांच्या निषेधार्त  पदयात्रा काढत आहेत.

या पदयात्रेत अमित शहा आणि योगी आदित्यनाथ सहभागी होत आहेत. तर दिल्लीत भाजप कार्यकर्ते कम्युनिस्ट कार्यालवर मोर्चा काढणार आहेत. देशभरातील कार्यकर्ते सुद्धा केरळमधे जाऊन आंदोलन करणार आहेत. ही पदयात्रा तब्बल 14 दिवस चालणार आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघच्या कार्यकर्त्यांच्या हत्येविरोधात ही पदयात्रा काढण्यात आल्याची माहिती अमित शहांनी दिली आहे. या पदयात्रेचं नाव जनरक्षा पदयात्रा आहे. केरळातील राजकीय हिंसेला केरळचे  मुख्यमंत्री पी. विजयन  जबाबदार असल्याचा आरोप अमित शहा यांनी केला आहे.

2001 पासून केरळात 120 भाजप कार्यकर्त्यांची हत्या झाली आहे.केरळात डाव्या आघाडीचं सरकार आल्यानंतर गेल्या एका वर्षात 14 कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आहेत.

First published: October 4, 2017, 8:53 AM IST

ताज्या बातम्या