गुगलच्या जाहिरातींमध्ये भाजप आघाडीवर, तर काँग्रेस सहाव्या क्रमांकावर

गुगलच्या जाहिरातींमध्ये भाजप आघाडीवर, तर काँग्रेस सहाव्या क्रमांकावर

गुगलवर करण्यात आलेल्या एकूण राजकीय जाहिरातींमध्ये भाजपच्या जाहिरातींचा ३२ टक्के वाटा आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 05 एप्रिल : लोकसभा निवडणुकींच्या तोंडावर सर्वच पक्षांनी आपलं शक्तिप्रदर्शन दाखवण्यास सुरूवात केलेली आहे. यातच गुगलचं सर्च इंजिनवर मोठ्या प्रमाणावर राजकीय जाहिराती केल्या जातात. दरम्यान, इंटरनेट जायटंस इंडियन ट्रान्स्परन्सी या संस्थेनं जाहीर केलेल्या अहवालानुसार गुगलवरील जाहिरातींमध्ये भाजप आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे.

गुगलवर करण्यात आलेल्या एकूण राजकीय जाहिरातींमध्ये भाजपच्या जाहिरातींचा ३२ टक्के वाटा आहे. तर या राजकीय जाहिरातींमध्ये काँग्रेस सहाव्या क्रमांकावर असून काँग्रेसचा जाहिरातींमधील वाटा केवळ ०.१४ टक्के. या अहवालानुसार गुगलवरील राजकीय जाहिरातींवर राजकीय पक्ष आणि त्यांच्याशी संबंधितांनी १९ फ्रेब्रुवारी २०१९ पर्यंत एकूण ३.७६ कोटी रुपये खर्च केले आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

दरम्यान, भाजपनं राजकीय जाहिरातींवर १.२१ कोटी रुपये खर्च केले आहेत. भाजपनंतर आंध्र प्रदेशातील जगन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षाचा क्रमांक लागतो. वायएसआर काँग्रेसने राजकीय जाहिरातींवर १.०४ कोटी रुपये खर्च केले आहेत. तर, वायएसआरनंतर तिसरा क्रमांक लागतो तो म्हणजे चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगु देसम पक्षाचा. धक्कादायक म्हणजे, गुगलच्या जाहिरातींमध्ये काँग्रेसचा सहावा क्रमांक असून काँग्रेसने राजकीय जाहिरातींवर केवल ५४ हजार १०० रुपये खर्च केले आहेत.

यात दसमसाठी जाहिरात करणाऱ्या प्रमाण्य स्ट्रेटजी कंसल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा तिसरा क्रमांक लागतो. नायडू यांचा प्रचार करण्यासाठी 63.43 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यामुळं आता जाहिरांतीवर केलेल्या खर्चाचा फायदा कोणत्या पक्षाला होणार, हे 23 मे रोजी कळेल.

सैराट ते कागर, मेकओव्हरनंतरची 'आर्ची'ची पहिली UNCUT मुलाखत

First published: April 5, 2019, 8:38 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading