उत्तर प्रदेश महापालिका निवडणुकीत कमळं उमललं;16 पैकी 14 जागांवर विजय

तर दुसरीकडे राहुल गांधींचा खासदारकी क्षेत्र असलेल्या अमेठी नगर पंचायतच्या निवडणुकीतही भाजपने घवघवीत यश संपादन केलं आहे. एकूण 652 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने यश मिळवला आहे.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Dec 1, 2017 05:29 PM IST

उत्तर प्रदेश महापालिका निवडणुकीत कमळं उमललं;16 पैकी 14 जागांवर विजय

01 डिसेंबर:उत्तर प्रदेशमधील नगर निगम निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये 16 महानगरपालिकांपैकी 14मध्ये भाजपने विजय मिळवला आहे.

या निवडणुकांमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेसला एकही महानगरपालिका जिंकत आलेली नाही. तर दुसरीकडे राहुल गांधींचा खासदारकी क्षेत्र असलेल्या अमेठी नगर पंचायतच्या निवडणुकीतही भाजपने घवघवीत यश संपादन केलं आहे. एकूण 652 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने यश मिळवला आहे. तर अलीगढ आणि मेरठच्या महानगरपालिकांमध्ये मात्र बीएसपीने विजय मिळवला आहे. त्यामुळे येत्या काळात बीएसपी पुन्हा कमबॅक करतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

उत्तर प्रदेशातील लखनौ, वाराणसी ,फिरोझाबाद,कानपूर,मोरादाबाद, गाझियाबाद, मथुरा, आग्रा,अयोध्या ,झाशी,सहारनपूर,बरेली या महत्त्वाच्या महानगरपालिका आता भाजपने काबीज केल्या आहेत. यावेळी 3.36 कोटी मतदारांनी मतदान केलं. तसंच 52 टक्के  मतदान झालं जे मागच्या वेळच्या तुलनेत 6 टक्क्यांहून अधिक होतं.  या निवडणुकीतील एक महत्त्वाची बातमी म्हणजे

त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये तरी योगी सरकारची जादू कायम असल्याचं चित्र आता दिसत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 1, 2017 09:59 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...