अरुण जेटलींच्या धोरणांमुळे देशात आर्थिक मंदी, भाजप खासदाराचा घरचा अहेर

अरुण जेटलींच्या धोरणांमुळे देशात आर्थिक मंदी, भाजप खासदाराचा घरचा अहेर

'देशातील आर्थिक परिस्थिती सुधारणे हेदेखील 370 कलम हटवण्याइतकंच महत्वाचे आहे.’

  • Share this:

पुणे, 19 ऑगस्ट : ‘माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या कार्यकाळात राबविलेल्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देशात आर्थिक मंदी आली आहे,’ असा धक्कादायक आरोप करत भाजप नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पक्षाला घरचा अहेर दिला आहे.

‘देशात आर्थिक मंदी आली असून सरकारने जनतेवर भरमसाठ कर लावल्याने ही आर्थिक मंदी जाणवू लागली आहे. देशातील आर्थिक परिस्थिती सुधारणे हेदेखील 370 कलम हटवण्याइतकंच महत्वाचे आहे,’ असं म्हणत सुब्रमण्यम स्वामी यांनी देशातील आर्थिक स्थितीवरून सरकारवर टीका केली आहे. पुण्यात श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या 319 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर सुब्रमण्यम स्वामी बोलत होते.

कलम 370 गेलं, आर्थिक संकटाचं काय?

काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम 370 रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने घेतला. या निर्णयाबाबतही स्वामी यांनी भाष्य केलं आहे. ‘कलम 370 संदर्भात सरकारने माझा सल्ला घेतला होता. मात्र आर्थिक धोरणाबाबत कुठलाही सल्ला घेतला नाही,’ असा खुलासा सुब्रमण्यम स्वामी यांनी केला.

पाकच्या पंतप्रधानावर निशाणा

पुण्यात बोलताना सुब्रमण्यम स्वामींनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर जोरदार टीका केली आहे. कलम 370 वर वारंवार वक्तव्य करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे सर्कसमधील एक पात्र आहेत, अशी खोचक टीका स्वामी यांनी केली आहे.

राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा आजपासून पुन्हा सुरू, इतर टॉप 18 बातम्या

Published by: Akshay Shitole
First published: August 19, 2019, 12:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading