Home /News /national /

दिल्लीत BJP नेत्यांची खलबतं, भाजप प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चांवर खुद्द चंद्रकांत पाटलांनी दिलं स्पष्टीकरण

दिल्लीत BJP नेत्यांची खलबतं, भाजप प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चांवर खुद्द चंद्रकांत पाटलांनी दिलं स्पष्टीकरण

भारतीय जनता पक्षाच्या (Bharitya janta party) राज्यातील (Maharashtra State Leaders)नेत्यांचा दौरा गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत सुरू आहे.

    नवी दिल्ली, 08 ऑगस्ट: भारतीय जनता पक्षाच्या (Bharitya janta party) राज्यातील (Maharashtra State Leaders)नेत्यांचा दौरा गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत सुरू आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदावरून चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची उचलबांगडी होण्याची चर्चा सध्या जोरदार सुरु आहे. मात्र चंद्रकांत पाटील यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. चंद्रकांत पाटील (BJP Chandrakant Patil) यांनी आज दिल्लीत केंद्रीय मंत्री नारायण राणेंची (Narayan Rane) भेट घेतली. भाजप नेत्यांचा दिल्लीचा दौरा सुरू होताच राज्य संघटनेने बदल होतील अशा प्रकारच्या वृत्ताना हवा मिळाला सुरुवात झाली होती. मात्र दुपार होताच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी हे सर्व वृत्त फेटाळून लावले. भाजप प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चा आमच्या पक्षात नसून या चर्चा फक्त मीडियात आहेत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा विचारही नाही. भारतीय जनता पक्ष मध्ये प्रदेशाध्यक्ष बदलण्याची एक प्रक्रिया आहे. तीन वर्षांचा कार्यकाळ मिळतो. दर तीन वर्षाने आमच्या पक्षात फेरबदल होतो. अगदी ग्रासरुटच्या पदापासून ते राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंत हा बदल होत असतो, असं पाटील म्हणाले. काँग्रेसला अद्याप पक्षाचा अध्यक्ष मिळाला नाही. भाजपाचं तसं नाही असा टोला त्यांनी लगावला आहे. त्यामुळे भाजपचा प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याच्या या निव्वळ चर्चा आहेत. त्यात काही तथ्य नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. राजकीय हेतूनं दिल्ली दौरा नाही तसेच दिल्लीत येण्यामागे कुठलाही राजकीय हेतू नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर राज्याला केंद्रीय मंत्री मिळाले. दिल्लीत येऊनही त्यांचं अभिनंदन करणं आवश्यक होतं. त्यामुळे मी दिल्लीत आलोय. त्यांचे अभिनंदन करण्यासाठी दिल्लीत आलो असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणालेत. पुण्यात सोमवारपासून निर्बंध शिथिल होणार?, अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक दिल्ली दौऱ्यामागे काहीच राजकीय हेतू नाही. प्रत्येक मंत्र्यांची खाती समजून घेत त्यांचा राज्याला कसा फायदा होईल यावर या भेटीत चर्चा झाल्याचं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. भाजप नेत्यांचा दिल्ली दौरा चंद्रकांत दादा पाटील, राज्य सरचिटणीस चंद्र चंद्रशेखर बावनकुळे, राम शिंदे, जयप्रकाश रावल, संजय कुटे, श्रीकांत भारतीय आदींचा काल सुरू झालेला दिल्ली दौरा आगामी 10 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. केंद्रात महाराष्ट्रातून नियुक्त झालेले सर्व केंद्रीय मंत्र्यांना सोबत या भाजपच्या नेत्यांची भेट होणार आहे. या नेत्यांसोबत भेटून त्यांच्या मंत्रालयाचा राज्याला कसा फायदा होतो याची माहिती घेण्याकरिता आलो आहे असे माहिती चंद्रकांत दादा यांनी दिली होती. मात्र या दिल्ली दौराच्या माध्यमातून चंद्रकांत दादा आपले शक्तीप्रदर्शन तर करीत नाही ना असा एक सवाल निर्माण होत आहे. संजय राऊत 'मातोश्री'वर, मुख्यमंत्र्यांसोबत या मुद्द्यावर चर्चा  दरम्यानच्या काळात आशिष शेलार यांनी अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांची वर्णी प्रदेशाध्यक्ष पदावर लागेल अशी चर्चा होती. मात्र या चर्चेला हवा देऊ नये असे खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आज रात्री उशिरापर्यंत देवेंद्र फडणवीस दिल्लीला पोहोचणार असून उद्या रावसाहेब दानवे यांच्या घरी सर्व भाजप खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये भाजप अध्यक्ष जे पी नड्डा आणि अमित शहा उपस्थित राहणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय नितीन गडकरी, पियुष गोयल नारायण राणे, बी एल संतोष उपस्थित राहणार आहेत.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: BJP, Chandrakant patil

    पुढील बातम्या