राम मंदिर आणि 'शबरीमला' बद्दल भाजपने काय दिलं आश्वासन?

राम मंदिर आणि 'शबरीमला' बद्दल भाजपने काय दिलं आश्वासन?

भारतीय जनता पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात राम मंदिराच्या मुद्द्याचा समावेश केला आहे.'राम मंदिर उभारणीबद्दल भाजपची भूमिका कायम आहे. घटनेच्या चौकटीत राहून आम्ही राम मंदिर बांधण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलू',असं भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये म्हटलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 8 एप्रिल : भारतीय जनता पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात राम मंदिराच्या मुद्द्याचा समावेश केला आहे.'राम मंदिर उभारणीबद्दल भाजपची भूमिका कायम आहे. घटनेच्या चौकटीत राहून आम्ही राम मंदिर बांधण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलू',असं भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये म्हटलं आहे.

भाजपशी युती करण्याआधी शिवसेनेने राम मंदिर प्रकरणी अध्यादेश काढण्याची मागणी केली होती. पण यावर आम्ही अध्यादेश काढणार नाही,असं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं. हा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर अध्यादेश काढणार नाही, असंही ते म्हणाले होते.

राम मंदिर प्रकरणी मध्यस्थ

राम मंदिर बांधण्यासाठीच्या सगळ्या पर्यायांचा आम्ही विचार करत आहोत, असंही भाजपने जाहीरनाम्यात म्हटलं आहे. राम मंदिर उभारणीचा खटला सध्या सुप्रीम कोर्टात आहे.

याआधी, या प्रकरणी कोर्टाने मध्यस्थांची समिती नेमली आहे. या मध्यस्थांमध्ये निवृत्त न्यायमूर्ती एफ. एम. खलिफुल्ला, अध्यात्मिक गुरू श्री. श्री. रविशंकर आणि वरिष्ठ वकील श्रीराम पंचू यांची मध्यस्थ म्हणून नेमणूक केली आहे.

या मध्यस्थांच्या समितीला कोर्टाने 8 आठवड्यांची मुदत दिली आहे. अयोध्या प्रश्नाचा निकाल निवडणुकांच्या नंतरच येऊ शकतो आणि हा प्रश्न कोर्टात असल्याने निवडणुकांमध्ये या प्रश्नाचा राजकीय वापरही होऊ शकत नाही. त्यामुळेच हा निकाल म्हणजे एका दगडात 2 पक्षी मारण्याचा प्रकार आहे, अशी टिप्पणी काँग्रेसने केली होती.

शबरीमलाच्या परंपरांचं महत्त्व

राम मंदिरासोबतच केरळमधल्या शबरीमला मंदिराचा मुद्दाही भाजपच्या जाहीरनाम्यात आहे. शबरीमला मंदिराशी लोकांच्या धार्मिक भावना जोडलेल्या आहेत. इथल्या परंपरांचं महत्त्व समजून त्याला घटनात्मक संरक्षणही दिलं जाईल, असं भाजपने म्हटलं आहे.

देशभरातल्या १३० कोटी जनतेच्या आशाआकांक्षांनाच भाजपने व्हिडन डॉक्युमेंटमध्ये मूर्त रूप दिलं आहे, असं केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह म्हणाले. 2014 च्या निवडणुकीत आम्ही जनतेच्या आशाआकांक्षा विचारात घेतल्या. आता होणाऱ्या निवडणुकीत जनतेच्या आमच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत, असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटलं आहे.

===================================================================================================================================================================

VIDEO: 'मोदी पंतप्रधान नाही झाले तर निदान खासदार तरी होतील'

First published: April 8, 2019, 3:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading