News18 Lokmat

भाजपने बाबासाहेबांना ओढूनताणून रामभक्त ठरवण्याचा प्रयत्न करू नये - प्रकाश आंबेडकर

2019च्या निवडणुकांआधीही भाजपने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना रामभक्त म्हटलं होते अशी विखारी टीका त्यांनी केली आहे.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Mar 30, 2018 09:17 AM IST

भाजपने बाबासाहेबांना ओढूनताणून रामभक्त ठरवण्याचा प्रयत्न करू नये - प्रकाश आंबेडकर

30 मार्च : बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावरून नवीन राजकीय वाद सुरू झाला आहे. उत्तर प्रदेशात शासकीय कागदपत्रांवर आणि शालेय पुस्तकांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं नाव भीमराव रामजी आंबेडकर असं लिहिलं जाणार आहे. त्यासंदर्भात उत्तर प्रदेश सरकारनं विधेयक देखील मंजूर केलंय. भाजपची विचारधारा पसरवण्यासाठी योगी आदित्यनाथ यांच्या सरकारनं हा घाट घातला असल्याचा आरोप बाबसाहेब आंबेडकर यांचे नातू आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केलेत.

2019च्या निवडणुकांआधीही भाजपने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना रामभक्त म्हटलं होते अशी विखारी टीका त्यांनी केली आहे. तसेच इतर दलित नेत्यांनी देखील बाबासाहेब आंबेडकरांच्या नावात रामजी शब्दाचा वापर करण्यावर आक्षेप घेतला आहे. दरम्यान हा बद्दल राज्यपाल राम नाईक यांच्या मागणीवरून करण्यात आल्याच समजतंय.

या सगळ्या वादावर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. भाजपने बाबासाहेबांच्या नावावरून राजकारण करणं थांबवावे, अशी इच्छासुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 30, 2018 09:17 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...