Home /News /national /

भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतात का? अमित शहांनी दिलं हे उत्तर

भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतात का? अमित शहांनी दिलं हे उत्तर

भाजप आणि शिवसेना हे पक्ष आता सोबत नसले तरी भविष्यात पुन्हा एकत्र येऊ शकतात का, असा प्रश्न भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले...

    मुंबई, 3 जानेवारी : भाजप आणि शिवसेना हे पक्ष आता सोबत नसले तरी भविष्यात पुन्हा एकत्र येऊ शकतात का, असा प्रश्न भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांना विचारण्यात आला. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात अमित शहांची ही मुलाखत होती. त्यात या प्रश्नावर अमित शहा म्हणाले, आत्तातरी याबद्दल आमच्या पक्षात कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे आत्ताच मी काही सांगू शकत नाही. शिवसेना एनडीएतून बाहेर पडल्याने भाजप आणि शिवसेनेची युती आता पुन्हा होऊ शकेल का, हे दोन पक्ष पुन्हा एकत्र येऊ शकतील का? असा प्रश्न सगळेच विचारत आहेत. त्यावर कोणतंही स्पष्ट उत्तर देणं मात्र अमित शहांनी टाळलं.महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेना यांच्यातले संबंध पूर्णपणे ताणले गेले आहेत. पण युतीबद्दल स्पष्टपणे बोलणं शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही टाळलं आहे. अमित शहा यांनीही या प्रश्नावर संदिग्ध उत्तर देणंच पसंत केलं. 'काँग्रेसला प्रश्न विचारा' महाराष्ट्रात भाजप- शिवसेना युतीला पूर्ण बहुमत होतं पण तरीही जनादेश डावलून सरकार बनवण्यात आलं. याबद्दल तुम्ही काँग्रेसला प्रश्न विचारले पाहिजे, असंही ते म्हणाले. आपली विचारसरणी सोडून आणि लोकशाहीचे सगळे संकेत धुडकावून लावत काँग्रेसने महाराष्ट्रात सरकार बनवलं, असाही आरोप त्यांनी केला. (हेही वाचा : भाजपची नवी मोहीम; Missed call देण्यासाठी का शेअर केलाय हा नंबर?) 'पराभवाची जबाबदारी माझी' गेल्या 3 विधानसभा निवडणुकांपैकी झारखंड वगळता हरियाणा आणि महाराष्ट्रात भाजपची कामगिरी चांगलीच झाली आहे, असं ते म्हणाले. झारखंडमध्ये झालेल्या पराभवाची जबाबदारी भाजपचा अध्यक्ष या नात्याने माझीच आहे, असंही त्यांनी सांगितलं. =================================================================================================
    Published by:Arti Kulkarni
    First published:

    Tags: Amit Shah, BJP, Shivsena

    पुढील बातम्या