'बंगाल को अपनी बेटी चाहिए, बुआ नहीं', भाजपचं ममता बॅनर्जींना जोरदार प्रत्युत्तर

'बंगाल को अपनी बेटी चाहिए, बुआ नहीं', भाजपचं ममता बॅनर्जींना जोरदार प्रत्युत्तर

भाजपनं नऊ महिला नेत्यांचे फोटो ट्वीटरवरुन शेअर केले आहेत. सोबतच बंगालला आपली मुलगी हवी आहे, आत्या नाही, अशा शब्दात ममता बॅनर्जींना प्रत्युत्तरही दिलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 27 फेब्रुवारी : तमिळनाडूसह पश्चिम बंगाल, आसाम, केरळ या राज्यांबरोबरच पुद्दूचेरी विधानसभा निवडणुकांची (Election Dates) शुक्रवारी घोषणा करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये यावेळी भाजपनं (BJP) आपली संपूर्ण ताकद लावली आहे. निवडणुकांआधीच तृणमूलचे (TMC) अनेक मोठे नेते भाजपात आल्यानं ममता बॅनर्जींना (Mamata Banerjee) भाजपसोबत चुरशीची लढत लढावी लागणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, मुख्यमंत्रीपदासाठी भाजपचा चेहरा कोण असणार, याची घोषणा करा असं टीएमसीकडून वारंवार म्हटलं जात आहे. इतकंच नाही तर टीएमसीनं भाजपवर टीका करत बंगाल को अपनी बेटी चाहिए असंही म्हटलं आहे. मात्र, आता भाजपनं या वाक्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजपनं बंगाल भाजपमधील नऊ महिला नेत्यांचे फोटो ट्वीटरवरुन शेअर केले आहेत. सोबतच बंगालला आपली मुलगी हवी आहे, आत्या नाही, अशा शब्दात ममता बॅनर्जींना प्रत्युत्तरही दिलं आहे. भाजपनं पोस्टरमध्ये ममता यांना आत्या म्हटलं आहे. टीएमसीनं बंगाल निवडणुकीच्या अभियानाच्या सुरुवातीलाच बंगालला आपली मुलगी हवी असल्याची घोषणा दिली होती.

टीएमसी दिल्लीतून प्रचारासाठी आलेल्या नेत्यांना बाहेरचे असल्याचं म्हणतं.त्यामुळे तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस पार्थ चॅटर्जी म्हणाले होते, की राज्यातील लोकांना आपली मुलगी पाहिजे, जी गेल्या अनेक वर्षांपासून मुख्यमंत्र्याच्या रुपात त्यांच्यासोबत आहेत. आम्हाला बंगालमध्ये बाहेरच्या कोणाला आणायचं नाही.

भाजपनं शेअर केलेल्या पोस्टरमध्ये भाजप नेत्या देबोश्री चौधरी, लॉकेट चटर्जी, रूपा गांगुली, भारती घोष आणि अग्निमित्रा पॉल यांच्यासह काही महिला नेत्यांचे फोटो शेअर केले आहेत. भाजपनं या नेत्यांना बंगालची मुलगी म्हटलं आहे.

भाजपनं बंगालमध्ये नेत्यांची पूर्ण फौजचं पाठवली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहानही रविवारी बंगालमध्ये सभा घेणार आहेत. ते 28 फेब्रुवारीला सकाळी कालीघाट मंदिर आणि दक्षिणेश्वर मंदिरात दर्शन घेणार आहेत. यानंतर धुलागोरीपासून हावडा साउथपर्यंत परिवर्तन रॅली काढली जाणार आहे. याठिकाणी ते सभा घेऊन जनतेला संबोधितही करतील.

Published by: Kiran Pharate
First published: February 27, 2021, 1:21 PM IST

ताज्या बातम्या