45 वर्षाच्या भाजप नेत्याचं तिसरं लग्न, 18 वर्ष लहान महिला कार्यकर्त्याशी केला विवाह

45 वर्षाच्या भाजप नेत्याचं तिसरं लग्न, 18 वर्ष लहान महिला कार्यकर्त्याशी केला विवाह

शंकरभाई यांचा पहिला विवाह फतेपुराचे खासदार रमेश कटारा यांच्या बहिणीसोबत झाला. त्यांना पहिल्या पत्नीपासून 4 मुलं आहेत.

  • Share this:

गुजरात, 06 नोव्हेंबर : महाराष्ट्रात सध्या विधानसभेसाठी कोण सत्ता स्थापन करणार यावरून वाद सुरू आहे. कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे सगळ्या मोठा पक्ष म्हणून भाजप आणि दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेत सत्ता संघर्ष सुरू आहे. या सगळ्या दरम्यान, गुजरातमध्ये एक अजब प्रकार समोर आला आहे. गुजरातच्या एका 42 वर्षांच्या भाजप नेत्याने तिसऱ्यांदा विवाह केला आहे. सध्या या नेत्याच्या तिसऱ्या विवाहाची जोरदार चर्चा सुरू आहे.

भाजप नेता शंकरभाई अमलियार दाहोद जिल्ह्याच्या ईकाईचे अध्यक्ष आहेत. त्यांनी नुकताच जिल्ह्यातील महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष महिलेसोबत विवाह केला आहे. त्यांच्या या लग्नाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. दाहोद जिल्ह्यातील फतेपुरा तालुक्यातील सिगडापाडा गावाचे निवासी असलेले शंकरभाई अमलियार हे सध्या जिल्ह्याचे भाजप अध्यक्ष आहेत. शंकरभाई यांचा पहिला विवाह फतेपुराचे खासदार रमेश कटारा यांच्या बहिणीसोबत झाला. त्यांना पहिल्या पत्नीपासून 4 मुलं आहेत.

शंकर यांच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू 2010 मध्ये झाला. त्यानंतर 2011मध्ये शंकरभाई यांनी जलोडेच्या ज्योत्सनाबेन यांच्याशी दुसरा विवाह केला. पण दुसऱ्या लग्नानंतर त्यांच्या घरातील वाद वाढत गेला. घरातील भांडणांमुळे शंकरभाई आणि ज्योत्सनाबेन यांनी एका वर्षात वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

इतर बातम्या - 'सरसकट कर्जमाफी, सरसकट ओला दुष्काळ आणि सरसकट पवार हे राज्याचे मुख्यमंत्री'

त्यानंतर 20 जूनला शंकरभाई यांनी तिसरा विवाह केला. आपल्या वयाच्या 18 वर्ष लहान युवतीसोबत त्यांनी लग्न केल्यामुळे ते सध्या चर्चेचा विषय आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी 27 वर्षांच्या जल्पाबेन यांच्याशी विवाह केला. जल्पाबेन यासुद्धा भाजप कार्यकर्ता आहे. सध्या जल्पाबेन या जिल्ह्याच्या महिला मोर्चा संघाच्या उपाध्यक्ष आहेत. तर दाहोदमध्ये एमएससीच्या दुसऱ्या वर्षाच त्या अभ्यास करत आहेत. त्यांच्या या विवाहानंतर ते मीडियामध्ये प्रसिद्ध झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 6, 2019 03:31 PM IST

ताज्या बातम्या