हत्येप्रकरणी दोषी, भाजप आणि RSS च्या 9 जणांना जन्मठेप

हत्येप्रकरणी दोषी, भाजप आणि RSS च्या 9 जणांना जन्मठेप

हत्येप्रकरणी दोषी आढळलेल्या भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 9 कार्यकर्त्यांना न्यायालयाने जन्मठेपीची शिक्षा सुनावली आहे.

  • Share this:

तिरुअनंतपुरम, 6 जुलै : माकप कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी दोषी आढळलेल्या भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 9 कार्यकर्त्यांना न्यायालयाने जन्मठेपीची शिक्षा सुनावली आहे. कन्नूर तुरुंगात 6 एप्रिल 2004 मध्ये माकप कार्यकर्ते के.पी. रवींद्रन यांच्या हत्या करण्यात आली होती.

केरळमधील कन्नूर तुरुंगात कैद असलेल्या भाजप आणि संघाच्या कैद्यांनी माकप कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या के. पी. रवींद्रन यांचा नंतर मृत्यू झाला. याप्रकरणी 31जणांवर आरोप झाले होते. तब्बल 15 नंतर आता अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयानं आपला निर्णय दिला आहे. न्यायालयानं याप्रकरणी 9 जणांचा हत्येत सहभाग असल्याचं सांगत त्यांना जन्मठेपीची शिक्षा सुनावली आहे.

याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयानं पवित्रन, फाल्गुनन, के. पी. रेघू, सनल प्रसाद, पी. के. दिनेश, के. ससी, अनिल कुमार, सुनी आणि अशोकन यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर माकपकडून समाधान व्यक्त करण्यात आलां आहे.

दरम्यान, केरळ आणि पश्चिम बंगाल सारख्या राज्यांना गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय हिंसाचार घेरलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि डाव्या पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये होणाऱ्या हिंसक कृतींनी टोक गाठल्याचं पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणूलच्या कार्यकर्त्यांमधला हिंसाचार थांबण्याचं काही नाव घेत नाही. काही दिवसांपूर्वीच उत्तर 24 परगना जिल्ह्यातल्या भाटपाडा इथे हिंसाचार उसळला. यात दोन जणांचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले.

या राज्यांमध्ये आतापर्यंत दोन्ही बाजूच्या शेकडो कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे अशा राजकीय हिंसाचारावर उपाय काय, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

जीव धोक्यात घालून तरुणाची बाईकवर स्टंटबाजी; हायवेवरील VIDEO व्हायरल

First published: July 6, 2019, 12:53 PM IST
Tags: BJPBJP-RSS

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading