मराठी बातम्या /बातम्या /देश /BJP-RSS आमने सामने! RSS नेत्याच्या घरात घुसून भाजप कार्यकर्त्यांचा तुफान राडा; दिली जीवे मारण्याची धमकी

BJP-RSS आमने सामने! RSS नेत्याच्या घरात घुसून भाजप कार्यकर्त्यांचा तुफान राडा; दिली जीवे मारण्याची धमकी

भाजपच्या (BJP) काही कार्यकर्त्यांनी RSS च्या एका नेत्याच्या घरी जावून तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा या दोन संघटनांमधील अंतर्कलह स्पष्टपणे समोर येताना दिसत आहे.

भाजपच्या (BJP) काही कार्यकर्त्यांनी RSS च्या एका नेत्याच्या घरी जावून तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा या दोन संघटनांमधील अंतर्कलह स्पष्टपणे समोर येताना दिसत आहे.

भाजपच्या (BJP) काही कार्यकर्त्यांनी RSS च्या एका नेत्याच्या घरी जावून तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा या दोन संघटनांमधील अंतर्कलह स्पष्टपणे समोर येताना दिसत आहे.

भिलाई, 22 फेब्रुवारी: भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी RSS च्या एका नेत्याच्या घरी जावून तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा या दोन संघटनांमधील अंतर्कलह स्पष्टपणे समोर येताना दिसत आहे. भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी आरएसएस नेते डॉ. दीप चटर्जी यांच्या घरात घुसून तोडफोड केली आहे. एवढंच नव्हे तर त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकीही दिली आहे. यानंतर संघाचा संबंधित नेता आणि कुटुंबीय घाबरले आहेत. त्यांना दहशतीत वावरण्याची वेळ आली आहे. या घटनेनंतर RSS नेता डॉ. दीप चटर्जी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यास गेले असता तिथेही कार्यकर्त्यांनी बराच गोंधळ केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना छत्तीसगड राज्यातील भिलाई येथील आहे. भिलाईच्या स्मृती नगर भागात राहणाऱ्या दीप चटर्जी यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर RSS आणि BJP यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. पक्षाचे कार्यकर्तेच भाजपचे शत्रू बनत आहेत. कारण त्यांनी पोलीस स्टेशन परिसरात पक्षाच्या काही नेत्यांची नावं घेतं मोठ्या प्रमाणात गोंधळ केला आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या दहशतीला घाबरून, डॉ. दीप चटर्जी गुन्हा दाखल करण्यासाठी जेव्हा पोलीस ठाण्यात गेले. तेव्हा त्यांची तक्रार दाखल करून घेण्यात आली नाही.

हे ही वाचा -पंतप्रधान मोदी, अमित शहांनी पुन्हा दाखवला विश्वास; देवेंद्र फडणवीस नव्या मिशनवर

सोशल मीडिया पोस्टमुळे वादाला सुरुवात...

खरंतर, हे संपूर्ण प्रकरण भाजपच्या दोन बड्या नेत्यांमधील आहे. यातील एका नेत्यासोबत डॉ. दीप यांचे निकटचे संबंध आहेत. यावेळी त्यांनी सोशल मीडियावर संबंधित नेत्याविरोधात मत व्यक्त केलं होतं. तसेच भाजप कार्यालयाच्या बांधकामासाठी दिलेली रक्कमही परत मागितली होती. डॉ. दीप चटर्जी यांच्या या सोशल मीडिया पोस्टमुळे भाजपाचे काही कार्यकर्ते चिडले.

हे ही वाचा -गुलाम नबी आझादांसाठी भाजपनं अंथरलं ‘रेड कार्पेट’, वाचा काय प्रकार आहे...

त्यामुळे त्यांनी रविवारी डॉ. दीप चॅटर्जी यांच्या घरावर भाजपच्या दुसऱ्या गटातील कार्यकर्त्यांनी हल्ला केला आहे. तसेच त्यांना जिवे मारण्याची धमकीही दिली. यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. याप्रकरणी पोलीस अधिकारी विश्वास चंद्रकर यांनी न्यूज 18 ला सांगितलं की, संबंधित दोन्ही बाजूंची तक्रार ऐकून घेतल्यानंतर चौकशी केली जाईल. तसेच चौकशीत समोर येणाऱ्या तथ्यांच्या आधारेच पुढील कारवाई केली जाईल.

First published:

Tags: BJP, Chhattisgarh