S M L

आगामी निवडणुकीतल्या युतीसाठी भाजपकडून शिवसेनेची मनधरणी, सूत्रांची माहिती

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिल्लीत शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी शिवसेनेनं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युती करावी अशी मागणी केलीय.

Sonali Deshpande | Updated On: Feb 11, 2018 12:43 PM IST

आगामी निवडणुकीतल्या युतीसाठी भाजपकडून शिवसेनेची मनधरणी, सूत्रांची माहिती

उदय जाधव, 11 फेब्रुवारी : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिल्लीत शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी शिवसेनेनं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युती करावी अशी मागणी केलीय. गुजरातमध्ये काठावर पास झालेल सरकार आणि कर्नाटकातील परिस्थिती पहाता भाजपने महाराष्ट्रात शिवसेनेसोबत युतीसाठी आग्रही भूमिका घेतलीय. मात्र शिवसेनेनं स्वबळावर लढण्याची घोषणा केलीय. त्यामुळे यापुढे युती नाही असं स्पष्टपणे शिवसेना नेत्यांनी अमित शहांना सांगितलं.

गेल्या साडे तीन वर्षात भाजपने केंद्रात आणि राज्यात शिवसेनेला जी वागणूक दिलीय त्याची ही आठवण शिवसेना नेत्यांनी या बैठकीत करून दिली. जी शिवसेना भाजपचे केंद्रात फक्त दोन खासदार असतानाही सोबत राहिली, त्या शिवसेनेला भाजपने आता दिलेल्या वागणुकीमुळे मोठी दरी निर्माण झालीय. ती भरून काढणं सध्या तरी अशक्य आहे.

अमित शहा यांचा सुधारीत प्रस्ताव शिवसेना नेत्यांनी बैठक संपल्यावर तात्काळ शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगितला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ शिवसेना नेत्यांशी चर्चाही केली. मात्र शिवसेनेनं धनुष्यातून बाण सोडलाय. त्यामुळे आता माघार नाही. अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 11, 2018 12:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close