गुजरात निवडणूक : भाजपची दुसरी यादी जाहीर

गुजरात निवडणूक : भाजपची दुसरी यादी जाहीर

या यादीत 36 उमेदवारांचा समावेश आहे.

  • Share this:

18 नोव्हेंबर : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली दुसरी यादी जाहीर केलीये. या यादीत 36 उमेदवारांचा समावेश आहे. यात टंकारा इथून राघवजीभाई गडारा यांना संधी देण्यात आलीये. तर पोरबंदरमधून बाबूभाई बोखरिया यांना उमेदवारी देण्यात आलीये.

शुक्रवारी भाजपने आपली 70 जणांचा यादी जाहीर केली होती. या यादीत मुख्यमंत्री विजय रुपानींना राजकोट पश्चिममधून तिकीट देण्यात आलंय. तर नितीनबाई पटेल यांना मेहसाणामधून उमेदवारी दिलीये.

पहिल्या यादीत 55 विद्यमान उमेदवारांनी पुन्हा संधी देण्यात आलीये. तर 15 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आलीये. भाजपने पटेल समुदयाच्या 17,ओबीसी 18 तर अनुसुचित जातीतून 3 तर अनुसुचित जमातीतून 11 जणांना उमेदवारी दिलीये.

विशेष म्हणजे,  182 जागेसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. यात पहिल्या टप्प्यात 89 जागांसाठी मतदान होणार आहे.

First published: November 18, 2017, 11:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading