नवी दिल्ली, 23 एप्रिल: भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी अभिनेता सनी देओल यांना गुरुदासपूरमधून येथून तर चंदीगडमधून किरण खेर यांना उमेदवारी दिली आहे. सनी देओल यांनी आजच भाजपमध्ये प्रवेश केला होता. निर्मला सीतारमण, पियूष गोयल यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नवी दिल्लीत भाजप मुख्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला.यापूर्वी भाजपचे दिवंगत नेते विनोद खन्ना यांनी गुरुदासपूरमधून जागेवरून निवडणूक लढवली होती. पक्षाने खेर यांना पुन्हा एकदा चंदीगडमधून उमेदवारी दिली आहे.
BJP releases 26th list of candidates for 3 #LokSabhaElections2019 seats in Chandigarh & Punjab. Sunny Deol to contest from Gurdaspur, Som Prakash from Hoshiarpur, and Kirron Kher from Chandigarh. pic.twitter.com/ca0C239gwO
सनी देओल हा धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांचा मोठा मुलगा आहे. तर धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी हेमा मालिनी या मथुरा येथून भाजपच्या खासदार आहेत. धर्मेंद्र यांना पहिल्या पत्नीपासून सनी देओल, बॉबी देओल, अजीता देओल आणि विजेता देओल ही चार मुलं आहेत. सनीच्या दोन्ही बहिणी अजीता आणि विजेता अमेरिकेत राहतात. त्या बॉलिवूडच्या झगमगाटापासून फार लांब आहेत.
धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी हेमा मालिनी यांनाही ईशा देओल आणि अहाना देओल या दोन मुली आहेत. सनीच्या पत्नीचं पूर्ण नाव पूजा देओल आहे. पूजा सार्वजनिक ठिकाणी फार कमी दिसते. १९८४ मध्ये सनीने पूजाशी लग्न केलं. सनीला करण आणि राजवीर ही दोन मुलं आहेत. करण दओल लवकरच पल पल दिल के पास सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. येत्या १९ जुलैला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
सनी देओलच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर १९८३ मध्ये बेताब सिनेमातून सनीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पहिलाच सिनेमा सुपरहिट ठरला होता. सिनेमात पदार्पण करण्यापूर्वी सनी बर्मिंघममध्ये अभिनय शिकण्यासाठी गेला होता.
सनीने सनी देओल ने 'घायल', 'दामिनी', 'डर', 'बॉर्डर', 'गदर', 'क्रोध', 'आग का गोला', 'हिम्मत', 'फर्ज', 'ये रास्ते हैं प्यार के', अर्जुन पंडित, 'जो बोले सो निहाल' आणि 'बिग ब्रदर' या सिनेमांसारखे अनेक हिट सिनेमे दिले आहेत. एवढंच नाही तर सनीच्या सिनेमांचे संवादही तेवढेच हिट झाले. आजही त्याच्या गदर सिनेमातील संवाद प्रेक्षकांच्या तोंडपाठ आहेत. गदर सिनेमातील त्याची अमिषा पटेलसोबतची केमिस्ट्री लोकांना भलतीच आवडली होती.
नुकतेच त्याने 'मोहल्ला अस्सी' आणि 'भैयाजी सुपरहिट' सिनेमात काम केलं होतं. हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटले होते. आता तो ब्लँक सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या सिनेमातून डिंपल कपाडियाचा भाचा करण कपाडिया बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.