मराठी बातम्या /बातम्या /देश /

'...तर तिथेच राजीनामा दिला असता', शपथविधी वादावर उदयनराजे भोसलेंची पहिली प्रतिक्रिया

'...तर तिथेच राजीनामा दिला असता', शपथविधी वादावर उदयनराजे भोसलेंची पहिली प्रतिक्रिया

भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या 'जय भवानी जय शिवाजी' या घोषणेवर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतला.

भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या 'जय भवानी जय शिवाजी' या घोषणेवर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतला.

भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या 'जय भवानी जय शिवाजी' या घोषणेवर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतला.

मुंबई, 23 जुलै : नवनिर्वाचीत राज्यसभा सदस्यांचा शपथविधी काल (बुधवारी) पार पडला. यावेळी महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, भाजपचे उदयनराजे भोसले यांच्यासह काही खासदारांनी शपथ घेतली. मात्र शपथ घेत असताना भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी दिलेल्या 'जय भवानी जय शिवाजी' या घोषणेवर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय घोषावर आंक्षेप घेतल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या वादावर आता स्वत: उदयनराजे भोसले यांनीच प्रतिक्रिया दिली आहे. 'रेकॉर्ड वर फक्त शपथ जाईल, असं सभापतींनी संगितलं. त्याच्यावर वाद विवाद होत आहे. शिवाजी महाराजांच्या नावाने खूप राजकारण झाले. महाराजांचा अवमान झाला असता तर मी गप्प बसणारा नाही. तिथल्या तिथे राजीनामा दिला असता,' असं म्हणत उदयनराजे भोसले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. उदयनराजेंनी केला काँग्रेसवरच आरोप 'ज्यांनी आक्षेप घेतला ते नेते काँग्रेस की राष्ट्रवादीचे मला माहीत नाही.जे घडले नाही ते भासविण्याचा प्रयत्न करू नका, अशी माझी विनंती आहे. काँग्रेसच्या सदस्याने का आक्षेप घेतला याचे उत्तर मला विचारण्याऐवजी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेला विचारा. आक्षेप घेताना राज्यघटनेचा आधार घेतला. नायडू यांनी चुकीचे केले नाही,' असं उदयनराजेंनी म्हटलं आहे. दरम्यान, या प्रकरणावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्वीट करत भाजपवर टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे ? असा सवाल राऊत यांनी केला आहे. तसंच भाजपचे या विषयांवर तोंड बंद आंदोलन सुरू झालं आहे. तर दुसरीकडे संभजी भिडे यांच्याकडून सांगली आणि सातारा जिल्हा बंदची घोषणा अद्याप झालेली नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
First published:

Tags: Udayan raje bhosle

पुढील बातम्या