ठाकरे सरकारला अडचणीत आणण्यासाठी भाजपचं आणखी एक पाऊल, खासदार विनय सहस्त्रबुद्धेंनी केली तक्रार

ठाकरे सरकारला अडचणीत आणण्यासाठी भाजपचं आणखी एक पाऊल, खासदार विनय सहस्त्रबुद्धेंनी केली तक्रार

भाजपचे राज्यसभा खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी मानवाधिकार आयोगाकडे राज्यातील विविध घटनांच्या पार्श्वभूमीवर तक्रार केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 सप्टेंबर : पालघर हत्याकांडानंतर बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासावरून राज्यातील ठाकरे सरकारला भाजपकडून वारंवार टार्गेट करून अडचणीत आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. अशातच आता भाजपचे राज्यसभा खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी मानवाधिकार आयोगाकडे राज्यातील विविध घटनांच्या पार्श्वभूमीवर तक्रार केली आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती, कंगना राणावत यांची बदनामी तसेच माजी नौदल अधिकाऱ्याला केलेली मारहाण या मुद्द्यावरून भाजप खासदारांनी मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली. खासदार विनय सहस्रबुद्धे यांच्या नेतृत्वात खासदार भागवत कराड आणि विकास महात्मे यांच्या शिष्टमंडळाने मानव अधिकार आयोगाला निवेदन दिले. राज्यात मानवाधिकाराचे उल्लंघन होत असून मानवाधिकार आयोगानं लक्ष द्यावे ही विनंती करण्यात आली आहे.

त्यामुळे आधीच सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेल्यानंतर मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत राज्य सरकारला अडणीत आणण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला होता. त्यानंतर आता मानवाधिकार आयोगाकडेही तक्रार करण्यात आल्याने भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढवण्यासाठी पूर्ण ताकदीसह प्रयत्न केले जात असल्याचं पाहायला मिळत आहे.

मुंबई महापौरांच्याही अडचणीत वाढ

राज्यात शिवसेनेची कोंडी करण्यात आल्यानंतर राजधानी मुंबईतही शिवसेनेसमोरील संकट वाढू शकतं. कारण मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. मुंबईत शिवसेनेविरोधात भाजपनं नवा गेम प्लान आखला आहे. मुंबई महापालिकेतील भाजपच्या 65 नगरसेविकांच्या स्वाक्षरीचं एक पत्र देवून विशेष महासभेची मागणी केली आहे. विशेष महासभेत मुंबई महापालिकेतील भोंगळ कारभाराला महापौर किशोरी पेडणेकर यांना जबाबदार धरण्यात येणार आहे. एवढंच नाही तर त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यात येणार आहे.

Published by: Akshay Shitole
First published: September 16, 2020, 5:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading