फक्त 58 दिवसांसाठी खासदार! शपथविधीनंतर 2 महिन्यात भाजप नेत्याचा कोरोनामुळे मृत्यू

फक्त 58 दिवसांसाठी खासदार! शपथविधीनंतर 2 महिन्यात भाजप नेत्याचा कोरोनामुळे मृत्यू

भाजप नेते अशोक गास्ती यांचं कोरोनामुळे निधन, बंगळुरुत घेतला अखेरचा श्वास

  • Share this:

नवी दिल्ली, 17 सप्टेंबर: देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कर्नाटकमधील भाजपचे नेते आणि राज्यसभेचे खासदार अशोक गास्ती यांच गुरुवारी बंगळुरुत निधन झालं. संसदेत खासदार म्हणून शपथ घेतल्यानंतर दोन महिन्यात त्यांना कोरोना झाला आणि त्यामुळे त्यांचं निधन झाल्याची माहिती मिळाली आहे. भाजपचे अशोक गास्ती यांनी 22 जुलैला पदाची शपथ घेतली. त्यानंतर सप्टेंबरमध्ये त्यांची अचानक प्रकृती बिघडल्यानं चाचण्या करण्यात आल्या. गास्ती यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना 2 सप्टेंबरला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. अशोक गास्ती यांच्यावर उपचार सुरू असताना गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

व्हेंटिलेटर होते अशोक गास्ती, पण..

कोविडबाधित अशोक गास्ती यांच्यावर बंगळुरु येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. गेल्या काही दिवसांपूर्वी अशोक गास्ती यांची प्रकृती खालावली होती. त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं होतं. अशोक गास्ती हे कर्नाटक मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष होते. 22 जुलैला त्यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली होती.

कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यात भाजपला संघटीत बनवण्याचं श्रेय अशोक गास्ती यांनाच दिलं जात होतं. अशोक गास्ती यांनी वयाच्या 18 व्या वर्षांपासून भाजपमध्ये होते. कर्नाटक भाजप युवा मोर्चाचे ते माजी अध्यक्ष होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) ते स्वयंसेवक होते.

देशात 24 तासांत 98 हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद

दरम्यान, सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते असा अंदाजही अनेकांनी व्यक्त केला आहे. साधारण दर दिवसाला कोरोनाचे 85 ते 95 च्या आसपास नवीन लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येत असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या नवीन आकडेवारीनुसार देशात गेल्या 24 तासांत 97 हजार 894 लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

कोरोनाचा कहर आणि सत्ताधाऱ्यांचा कलेक्शनवर भर, आशिष शेलारांचा घणाघात

देशातील कोरोनाचा आतापर्यंतचा आकडा 50 लाख पार झाला असून 51 लाख 18 हजार 254 रुग्ण आहेत. तर कोरोनामुळे 24 तासांत 1 हजार 132 रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांचा आकडा 83 हजार 198 वर पोहोचला आहे. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनातून बरे झालेल्या लोकांची संख्याही 40 लाखांहून अधिक आहे. आतापर्यंत 40 लाख 25 हजार 80 रुण बरे झाले असून बुधवारी विक्रमी 82 हजार 922 लोकांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. देशात सध्या 10 लाख 9 हजार 976 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

कोरोनाविरुद्ध लढा देत असताना भारतात सप्टेंबर महिन्यात मात्र खूपच चिंताजनक स्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. मृत्यूदर आणि रिकव्हरी रेट चांगला असला तरीही कोरोनाची लागण होण्याचा दर दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात 15 दिवसांमध्ये 13 लाख 08 हजार 991 नवीन रुग्ण सापडले आहेत. ब्राझिलला मागे टाकत अमेरिकेनंतर भारत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

हे वाचा-COVID: आजींच्या चितेला पुराने दिला वेढा, अखेर माणुसकी जिंकली; मन हेलावणारी घटना

15 दिवसांत भारतात जवळपास 16 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महाराष्ट्रात बुधवारी राज्यात 474 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारच्या तुलनेत ही संख्या कमी असली तरी बुधवारी राज्यात 23365 नवीन कोरोना रुग्णांचे निदान करण्यात आले आहे. हा आकडा गेल्या काही दिवसांच्या तुलनेत जास्त आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: September 17, 2020, 6:37 PM IST

ताज्या बातम्या