• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • मोदींच्या मंत्रिमंडळात अमित शहांचीही वर्णी, जे.पी.नड्डा होऊ शकतात भाजपाध्यक्ष

मोदींच्या मंत्रिमंडळात अमित शहांचीही वर्णी, जे.पी.नड्डा होऊ शकतात भाजपाध्यक्ष

नरेंद्र मोदींच्या कॅबिनेट मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांच्या यादीमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याही नावाचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली,30 मे : नरेंद्र मोदी आज दुसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. 2014 प्रमाणेच यावेळेसही नरेंद्र मोदी आणि त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधीचा सोहळा एक मेगा इव्हेंट ठरणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तब्बल 8 हजार पाहुण्यांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. सोबतच मोदींच्या कॅबिनेट मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांच्या नावांचीही यादी समोर आली आहे. विशेष म्हणजे या यादीमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याही नावाचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर, गुजरात भाजपचे अध्यक्ष जीतू वाघाणी यांनी अमित शहांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छादेखील दिल्या. याबाबतची माहिती त्यांनी  ट्विटरवर पोस्ट केली आहे. दरम्यान, शहांनंतर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी आता जे.पी.नड्डा यांच्याकडे दिली जाणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. (वाचा : हे मंत्री यावेळी पुन्हा मंत्रिमंडळात नाहीत, मोदी सरकार 2.0 मधून नावं गायब) या नेत्यांनाही संधी मिळण्याची शक्यता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोदींच्या मंत्रिमंडळात मोठ्या नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. यात राजनाथ सिंह, मुख्तार अब्बास नकवी, पीयूष गोयल, स्मृती इराणी, नितीन गडकरी, रामविलास पासवान, निर्मला सीतारमण, प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद, अनुप्रिया पटेल, नरेंद्र सिंह तोमर, धर्मेंद्र प्रधान, जेपी नड्डा, गिरीराज सिंह, आरके सिंह, राज्यवर्धन सिंह राठोड, अर्जुन सिंह, गजेंद्र सिंह शेखावत यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. (वाचा : सुप्रिया सुळेंना विरोधी पक्षनेतेपद मिळणार? दिल्लीत हालचालींना वेग) शपथविधीसाठी 8 हजार पाहुण्यांना निमंत्रण यात बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार, थायलंड, नेपाळ आणि भूतान या सारख्या देशांचा समावेश आहे. याशिवाय देशातील सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यपाल आणि विरोधी पक्षातील नेत्यांना बोलवण्यात आले आहे. काँग्रेसला अमित शहांसारख्या कणखर नेत्याची गरज - नटवरसिंह 2019च्या लोकसभा निवडणुकीतल्या काँग्रेसच्या पराभवावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. आता गांधी परिवाराचे जवळचे सहकारी आणि माजी केंद्रीय मंत्री नटवरसिंह यांनीच आपल्या पक्षाला घरचा अहेर दिला आहे. काँग्रेसला या पराभवातून बाहेर काढण्यासाठी अमित शहांसारख्या एका कणखर आणि प्रभावी नेत्याची गरज आहे, असं नटवरसिंह यांनी म्हटलं आहे. भाजपच्या संघटनात्मक व्यवस्थापनाची त्यांनी प्रशंसा केली. त्याचसोबत पक्षामधले मतभेद आणि अपयशाबद्दल पक्षाच्या काही बड्या नेत्यांवरही निशाणा साधला. हे नेते पदावर का? काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत काही मोठ्या नेत्यांची नावं घेतली. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे त्यांच्या मुलाला तिकीट देण्यासाठी आग्रही होते. त्याचबरोबर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्याही नावांचा उल्लेख करून राहुल गांधींनी त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली. या नेत्यांनी आपली मुलं आणि नातेवाईकांना तिकीट देण्यासाठी आग्रह धरला पण दुसऱ्या जागांचा विचार मात्र केला नाही, असं राहुल गांधी म्हणाले.त्यावरही नटवरसिंह यांनी मत व्यक्त केलं. पक्षाच्या अध्यक्षांनी स्पष्टपणे बोलूनही हे मुख्यमंत्री अजूनही पदावर का आहेत, असा सवाल त्यांनी विचारला. त्यांनी स्वत:हून राजीनामा द्यायला हवा होता, असंही नटवरसिंह म्हणाले. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत जर पक्षाचा नेता काही बोलत असेल आणि त्या गोष्टी बाहेर येत असतील तर त्या नेत्याने स्वत:हून बाहेर पडायला हवं, अशी परंपरा आहे. पण ही परंपरा आता पाळली जात नाही, असंही नटवर सिंह यांनी म्हटलं आहे. (वाचा : मोठी बातमी : राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? राहुल-पवार भेट सुरू) शरद पवार काँग्रेसचे नवे अध्यक्ष? राहुल गांधींसोबतच्या भेटीचा EXCLUSIVE VIDEO
  First published: