मराठी बातम्या /बातम्या /देश /मित्रपक्ष सोडून जात असल्याने अमित शहांना धक्का, नाराजी दूर करण्यासाठी खास योजना!

मित्रपक्ष सोडून जात असल्याने अमित शहांना धक्का, नाराजी दूर करण्यासाठी खास योजना!

'NDA मधली ही पडझड थांबविण्यासाठी अमित शहा यांनी खास योजना तयार केली असून नाराज मित्रपक्षांच्या मनधरणीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.'

'NDA मधली ही पडझड थांबविण्यासाठी अमित शहा यांनी खास योजना तयार केली असून नाराज मित्रपक्षांच्या मनधरणीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.'

'NDA मधली ही पडझड थांबविण्यासाठी अमित शहा यांनी खास योजना तयार केली असून नाराज मित्रपक्षांच्या मनधरणीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.'

    नवी दिल्ली, 20 डिसेंबर : NDA मधून एक एक मित्रपक्ष दूर जात असल्याने भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना धक्का बसला आहे. पाच राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकीतला पराभव. विरोधीपक्षंची एकजूट  यामुळं आगामी लोकसभा निवडणुकीतलं गणित कसं जुळवायचं याची चिंता शहांना पडली आहे. NDAतली ही पडझड थांबविण्यासाठी अमित शहा यांनी खास योजना तयार केली असून नाराज मित्रपक्षांच्या मनधरणीसाठी ते  प्रयत्न करत आहेत.

    त्याचाच एक भाग म्हणून गुरूवारी त्यांनी लोकजनशक्ती पार्टीचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान आणि खासदार चिराग पासवान यांना आपल्या निवासस्थानी बोलावून घेतलं आणि समजूनत काढली.

    बिहारमधल्या जागावाटपाबाबत त्यांच्या ज्या काही शंका होत्या त्या शंकाही दूर करण्याचा प्रयत्न केला.

    जागावाटपात अन्याय होणार नाही असं आश्वासनही त्यांनी पासवान यांना दिलं. अमित शहांचे हे प्रयत्न सुरू असतानाच तिकडे उपेंद्र कुशवाह यांनी भाजपची साथ सोडून काँग्रेसशी घरोबा केला.

    उपेंद्र कुशवाह यांनी सोडली भाजपची साथ

    पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काँग्रेसने आणखी एक धक्का दिला आहे. एनडीएला सोडचिठ्ठी देऊन उपेंद्र कुशवाह काँग्रेसमध्ये दाखल झाले आहे. दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसच्या नेत्यांनी कुशवाह काँग्रेसमध्ये दाखल झाल्याची घोषणा केली आहे.

    नवी दिल्लीत काँग्रेसचे नेते अहमद पटेल आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन कुशवाहा महाआघाडीत सहभागी झाले असल्याची घोषणा केली आहे.

    एनडीएकडून जागावाटपांचा घोळ कायम सुरू होता. पण त्यांनी कोणताही निर्णय दिला नाही. त्यामुळे मला बिहारसाठी काम करायचं आहे असं कुशवाह यांनी सांगितलं.

    आमची लढाईही राज्य घटना वाचवण्यासाठी आहे. सीबीआय असो, रिझर्व्ह बँक असो, शेतकरी असो यांना वाचवण्यासाठी आमची लढाई आहे. पंतप्रधान मोदींची देशात हुकुमशाही सुरू आहे. देशात अघोषित आणीबाणी लागू झाली आहे अशी टीका यावेळी तेजस्वी यादव यांनी केली.

     

    बीड सैराट हत्याकांड VIDEO: 'माझं लेकरू परत कोण आणून देणार', आईने फोडला हंबरडा

    First published:

    Tags: Bjp president amit-shah, Narendra modi, NDA, Ram vilas paswa, अमित शहा, एनडीए, नरेंद्र मोदी, भाजप